CNG Price Hike : वाहन चालकांना झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

111

ग्लोबल मार्केट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबल्याची घोषणा झाल्यानंतर लवकरच इंधन स्वस्त होणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, या दिलासादायक चर्चेदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक तीव्र झटका बसला आहे. पुणे शहरात नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीच्या किमतींमध्ये (Pune CNG Price Hike) पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे इंधनाचे दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालक आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.  (CNG Price Hike)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार ‘लाडक्या बहिणी’ आता कायमच्या अपात्र)

पुण्यात सीएनजीचे (Pune CNG Price Hike) दर सोमवारी मध्यरात्रीपासून वाढणार आहे. सीएनजीचे (CNG) दर प्रति किलो १ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सीएनजीचे दर प्रति किलो आता ९५.७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर यापूर्वी सीएनजीचे दर ९४.७५ रुपये होते. अमेरिका आणि इराण देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात सीएनजीच्या दरात २.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज सोमवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना सीएनजीसाठी मध्यरात्रीपासून जादा पैसे मोजावे लागणार आहे.

(हेही वाचा – Amravati : महामार्गावरील वृक्षांना आग लावून तोडीचे षडयंत्र?; वृक्षप्रेमींकडून चौकशीची मागणी)

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं यु्द्धाला पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये १४ अटींवर शांतता करार करण्यात आला. दोन्ही देशांत शांतता करार झाल्यानंतर होर्मुझीची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा दर स्वस्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.