Solapur Administration : आषाढी वारीचा परिणाम मतदार यादी पुनरिक्षणावर; प्रशासनाची मुदतवाढीची मागणी

73
Solapur administration meeting regarding voter list revision.
Solapur Administration : आषाढी वारीचा परिणाम मतदार यादी पुनरिक्षणावर; प्रशासनाची मुदतवाढीची मागणी

Solapur Administration               मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेचे नियोजित वेळापत्रक आषाढी वारीमुळे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणारी ही मोहीम नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. आषाढी वारीदरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वारी नियोजन, व्यवस्थापन आणि विविध सेवांमध्ये व्यस्त राहणार असल्याने एसआयआर मोहीम नियोजित वेळेत प्रभावीपणे राबविणे कठीण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Solapur Administration)

(हेही वाचा – NEET 2026 Exam: पुनर्परीक्षेपूर्वीच सर्व्हर क्रॅश, परीक्षेआधीच विद्यार्थ्यांची चिंता वाढली)

या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करणार आहेत. तसेच मतदारांच्या नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर तपशीलांमधील बदलांची नोंद करण्यात येणार असून अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि डुप्लिकेट (एएसडीडी) नोंदींची पडताळणीही केली जाणार आहे. सन २००२ ते २००४ या कालावधीतील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. (Solapur Administration)

(हेही वाचा – Ind vs Afg, ODI Match : गुरबाझने आपल्या शतकाचं श्रेय गौतम गंभीरला का दिलं?)

शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमाणपत्राच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत आतापर्यंत ८५.५१ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. शहरी भागात १० लाख ८५ हजार ७४४ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४५६ मतदारांचे म्हणजेच २५.०९ टक्के मॅपिंग अद्याप बाकी आहे. ग्रामीण भागात ही टक्केवारी १०.४६ इतकी आहे. उर्वरित १४.४९ टक्के काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बीएलओंना देण्यात आल्या असून यासंदर्भात लवकरच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. (Solapur Administration)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.