Crime : छोटा राजन टोळीचा शार्पशूटर तांबेला वरळीतून शस्त्रासह अटक

मुंबई पोलिसांनी शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रोड्रिंक्स याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

228
Crime : छोटा राजन टोळीचा शार्पशूटर तांबेला वरळीतून शस्त्रासह अटक
Crime : छोटा राजन टोळीचा शार्पशूटर तांबेला वरळीतून शस्त्रासह अटक

कुख्यात गुंड छोटा राजन टोळीचा शार्पशूटर (Chota Rajan Gang Sharpshooter Arrested) शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रोड्रिंक्स (Sham Tambe @Roderick’s) याला मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) देशी बनावटीच्या पिस्तुलासह (country made pistol) वरळी येथून अटक केली आहे.

शाम उर्फ सॅव्हीओ याच्याविरुद्ध मुंबईत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे या सारखे गंभीर गुन्हे असून दोन गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का (Mcoca) अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. नुकताच जामिनावर बाहेर पडलेल्या शाम उर्फ़ सॅव्हीओ हा गंभीर गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असण्यापूर्वीच गुन्हे शाखा कक्ष ३ (Mumbai Crime Branch Unit 3)कडून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सतर्कता (Mumbai Police alert) बाळगण्यात येत आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून जामिनावर बाहेर पडलेले सराईत गुन्हेगार तसेच पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगारांवर (Police Records criminal ) तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर शहरात बेकायदेशीर शस्त्र (Illegal Weapon) बाळगणारे, तसेच परराज्यातील शस्त्र तस्करी (Weapon Smuggling) करणाऱ्यावर आणि अंडरवर्ल्ड गँगस्टर (Underworld Gangster) यांच्यावर मुंबई गुन्हे शाखा लक्ष ठेवते. तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यास त्या गुंडांना चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. (Crime)

(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही; शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी)

दरम्यान गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रपोनि. दीपक सुर्वे (Mumbai Crime Branch Unit 3 Incharge) यांच्या पथकाला गुप्त माहितीदाराने अशी माहिती दिली की, कुख्यात गँगस्टर छोटा राजन टोळीचा एक सराईत गुंड शाम तांबे हा गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने वरळीतील जिजामाता नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. (Crime)

पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे, सपोआ. चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ३ चे प्रपोनि. दीपक सुर्वे, पोनि. शामराव पाटील, सपोनि. समीर मुजावर, अंमलदार आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड आणि शिवाजी जाधव या पथकाने सोमवारी वरळी जिजामाता नगर, हॉटेल कृष्णा येथे सापळा लावला. छोटा राजन टोळीचा शार्प शुटर शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रोड्रिंक्स (Chota Rajan Gang Sharpshooter Shaam Tambe @ Roderick’s) हा त्या ठिकाणी गुन्ह्याच्या हेतूने येताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेऊन युनिट ३च्या कार्यालयात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे एक पिस्तुल, ३ जिवंत राऊंड (काडतुसे) (Country Made Pistol and live Round) सापडली.

शाम तांबे उर्फ सॅव्हीओ रोड्रिंक्स याच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाम तांबे उर्फ़ सॅव्हीओ हा छोटा राजन टोळीचा एकेकाळचा शार्प शूटर (Chota Rajan Gang Sharpshooter Shaam Tambe @ Roderick’s) असून त्याच्याविरुद्ध दक्षिण मुंबईत खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, दरोडा या सारखे अनेक गुन्हे दाखल असून दोनवेळा मुंबई पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली होती. अनेक वर्षे तुरुंगात असणारा शाम तांबे हा सध्या जामिनावर बाहेर आला होता व वरळी येथे आपल्या कुटूंबासोबत राहत होता. त्याच्याकडे मिळून आलेल्या पिस्तुल वरून तो गंभीर गुन्हा करण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २९ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.