Chhattisgarh Bus Accident: दुर्गमध्ये भीषण बस अपघात, १५ जणांचा मृत्यू!

131
Chhattisgarh Bus Accident: दुर्गमध्ये भीषण बस अपघात, १५ जणांचा मृत्यू!
Chhattisgarh Bus Accident: दुर्गमध्ये भीषण बस अपघात, १५ जणांचा मृत्यू!

दुर्ग (Durg) जिल्ह्यात (Chhattisgarh Bus Accident) मंगळवारी (९ एप्रिल) रात्री घडलेल्या घटनेनं छत्तीसगड (Chhattisgarh Bus Accident) हादरलं आहे. एक बस खाणीत कोसळल्याने १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरा एक बस या खाणीत कोसळली. त्यात बसलेल्या १५ कामगारांचा मृत्यू झाला. (Chhattisgarh Bus Accident) बसमध्ये ४० हून अधिक लोक होते. हे सर्व लोक जवळच असलेल्या डिस्टिलरी प्लांटमध्ये काम करायचे. (Chhattisgarh Bus Accident)

(हेही वाचा – Ahmednagar: मांजरीचा जीव वाचताना बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात पडून ५ जणांचा मृत्यू)

अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. (Chhattisgarh Bus Accident) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस केडिया डिस्टिलरी (Kedia Distillery) येथून रायपूर कुम्हारी रोडच्या दिशेने जात होती. त्यानंतर कुम्हारी पोलीस ठाण्याजवळील मुरूम खाणीत बस ५० फूट खाली पडली. माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफ (SDRF) पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी दोन क्रेन तैनात करण्यात आल्या असून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. (Chhattisgarh Bus Accident)

(हेही वाचा – Monsoon: कसा असेल यंदाचा मान्सून? स्कायमेटने वर्तवला अंदाज)

सायंकाळी कामगार कंपनीच्या (Kedia Distillery) बसने घरी परतत असताना अचानक हा अपघात झाला. (Chhattisgarh Bus Accident) या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती मुर्मू, पीएम मोदी आणि सीएम विष्णुदेव साई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. (Chhattisgarh Bus Accident) फॅक्ट्रीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा अपघात घडल्याची माहिती आहे. गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. (Chhattisgarh Bus Accident)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.