T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेले इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएल अर्धवट सोडणार

T20 World Cup 2024 : इंग्लिश संघ विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाकिस्तानबरोबर टी-२० मालिका खेळणार आहे. 

154
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी निवड झालेले इंग्लिश क्रिकेटपटू आयपीएल अर्धवट सोडणार
  • ऋजुता लुकतुके

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लिश बोर्डाने आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे आणि या संघातील आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांनी मायदेशी परत बोलावलं आहे. इंग्लिश संघ येत्या काही दिवसांत पाकिस्तान विरुद्ध चार सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. विश्वचषकासाठीच्या इंग्लिश संघात जोफ्रा आर्चरलाही संधी मिळाली आहे. जवळ जवळ १४ महिन्यांनंतर तो संघात परतला आहे. (T20 World Cup 2024)

विश्वचषकासाठी निवड झालेला संघच पाकिस्तान विरुद्धही खेळणार आहे. ही मालिका २२ मे पासून हेडिंग्लेला होणार आहे. आणि त्यापूर्वी इंग्लिश खेळाडूंना इंग्लंडमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आलं आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघांच्या जर्सीचं अनावरण)

आयपीएलमध्ये खेळत असलेले इंग्लिश खेळाडू पुढील प्रमाणे 

जोस बटलर (राजस्थान रॉयल्स), फिल सॉल्ट (कोलकाता नाईट रायडर्स), विल जॅक्स, रिसी टॉपली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), मोईन अली (चेन्नई सुपर किंग्ज), सॅम करन, जिमी बेअरस्टो, लिअम लिव्हिंगस्टोन (पंजाब किंग्ज) (T20 World Cup 2024)

इंग्लिश खेळाडूंच्या मायदेशी परतण्यामुळे कोलकाता आणि राजस्थान या संघांना नक्कीच फटका बसणार आहे. कारण, दोन्ही संघ बाद फेरीच्या जवळ आहेत. पण, बंगळुरू आणि पंजाबचं आव्हान संपुष्टात आल्यात जमा असल्यामुळे त्यांना याचा फारसा ताण जाणवणार नाही. आयपीएलचे साखळी सामने १९ मे ला संपणार आहेत आणि त्यानंतर अंतिम सामना २६ मे ला होणार आहे. तर टी-२० विश्वचषक स्पर्धा २ जूनपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होत आहे आणि त्यासाठी इंग्लिश संघ ३१ मे रोजी विंडिजमध्ये दाखल होणार आहे. त्यांचा पहिला सामना ४ जूनला स्कॉटलंडला होणार आहे. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.