लँडिंगपूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल

137

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा अपघात होता होता वाचला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड होण्यापूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात विमानातील क्रू-मेंबर्सनी पोलिसात तक्रार दिली होती.

नक्की काय घडले?

यासंदर्भातील माहितीनुसार, मंगळवारी २४ जानेवारी रोजी नागपूर-मुंबई इंडिगो फ्लाईट (फ्लाईट क्र. ६ई-४२७४) दुपारी १२ वाजेच्या सुमाराला मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी इंडिकेटरद्वारे क्रू मेंबर्सना समजले की, कोणीतरी आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. क्रू मेंबर्स आपत्कालीन दरवाजापर्यंत पोहोचले तेव्हा असे आढळले की, एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजावरील गेट कव्हर काढले होते. केबिन क्रूने याबाबतची माहिती कॅप्टनला दिली. त्यानंतर या प्रवाशाची तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी भादंविचे कलम ३३६ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यांसदर्भात विमानातील क्रू मेंबर्सचे मत नोंदवले जाईल, त्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – एअर एशियाच्या विमानाला धडकला पक्षी; करावी लागली इमर्जन्सी लँडिंग)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.