WFI Row : तात्पुरत्या समितीने भरवलेली राष्ट्रीय स्पर्धाच अधिकृत

भारतीय कुस्तीच्या कारभारावर सध्या नवनियुक्त फेडरेशनची कार्यकारिणी आणि आयओएनं स्थापन केलेली तात्पुरती समिती अशा दोघांनी दावा केला आहे. 

104
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्तीमध्ये मागच्या वर्षभरात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. आणि डिसेंबरमध्ये निवड झालेली पण, क्रीडा मंत्रालयाने नंतर निलंबित केलेली कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी तसंच ऑलिम्पिक असोसिएशनने स्थापन केलेली तात्पुरती समिती अशा दोघांनीही कारभारावर दावा केला आहे. मागच्या वर्षभरात या सावळ्या गोंधळामुळे कुस्तीतील राष्ट्रीय स्पर्धा आणि शिबीर झालेलं नाही. या दोन्हीवर दोन्ही गटांनी दावा केला आहे. (WFI Row)

नवनियुक्त कार्यकारिणीचे (क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलेली) अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर तात्पुरत्या समितीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फक्त आयओए (IOA) नियुक्त समितीने भरवलेली राष्ट्रीय स्पर्धाच अधिकृत असेल. आणि या स्पर्धेत खेळलेले खेळाडू सरकारी सुविधांसाठी पात्र असतील, असं त्यांनी सांगितलं आहे. (WFI Row)

(हेही वाचा – Arvind Kejriwal : ‘मी आरोपी नाही, तर…’ ; ईडीसमोर चौथ्यांदा हजर राहण्यास केजरीवाल यांचा नकार)

सिंग यांच्या कार्यकारिणीला राज्य कुस्ती संघटनांचा पाठिंबा

मंगळवारी संजय सिंग (Sanjay Singh) यांनी २९ जानेवारीला पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा भरवण्याची घोषणा केली होती. क्रीडा मंत्रालयाने मात्र कुस्ती फेडरेशन निलंबित असल्यामुळे त्यांनी भरवलेली स्पर्धा अधिकृत धरली जाणार नाही, असं म्हटलं आहे. सध्या संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या कार्यकारिणीला राज्य कुस्ती संघटनांचा पाठिंबा आहे. त्यांच्या जोरावरच ही कार्यकारिणी १२ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत जिंकून आली आहे. तर दुसरीकडे तात्पुरत्या समितीला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा मंत्रालय आणि साईचा पाठिंबा आहे. (WFI Row)

तात्पुरत्या समितीचे अध्यक्ष भुपेंदर सिंग बाजवा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हरयाणातील काही आखाड्यातील मल्लांनी कुस्ती फेडरेशनच्या पुण्यातील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सर्व खेळाडूंना तात्पुरत्या समितीने इशारा दिला आहे. (WFI Row)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.