Animal Survey : मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांचे १० वर्षांनी सर्वेक्षण

ह्यूमेन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने  महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. 

605
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी तसेच प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने १६ जानेवारी २०२४ पासून मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ह्यूमेन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने  महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. (Animal Survey)
यापूर्वी मुंबईमध्ये सन २०१४ मध्ये भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. भटक्या श्वानांचे सर्वेक्षण ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेकडून तर पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल. मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांच्या सध्याची वास्तविक संख्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल. तसेच २०१४ च्या संख्येसोबत त्याची तुलनात्मक मांडणी करण्यात येईल. (Animal Survey)
त्याआधारे नेमक्या ज्या भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे, त्या ठिकाणांसाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आखून प्राणी कल्याण संस्थांच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. या सर्वेक्षणातून प्राप्त स्थितीनुसार भटक्या श्वानांची सध्याची स्थिती आणि त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगानेही आवश्यक पावले उचलता येतील. तसेच पाळीव प्राण्यांच्या सर्वेक्षणातून लोकांमध्ये नेमके कोणते पाळीव प्राणी पाळण्याचा कल आहे, हे समजेल. तसेच मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि आरोग्य स्थितीही जाणून घेता येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले. (Animal Survey)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.