Boxing Championships : नागपूरमध्ये सुरु असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपची आशियाई चॅम्पियनशिपच्या दिशेने वाटचाल

रविवार, ५ एप्रिल या स्पर्धेच्या (Boxing Competition) पहिल्या दिवशी स्पर्धेमध्ये महिला बॉक्सरचा गवगवा होताना दिसला.

120
Boxing match at U-17 National Championships in Nagpur
Exciting moments from the U-17 National Boxing Championships.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतर प्रथमच महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी ७ वी अंडर-१७ ज्युनिअर मुले व मुली राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा (Boxing Competition) ५ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान नागपूर येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. ही स्पर्धा केवळ राष्ट्रीय स्तरापुरती मर्यादित राहिली नाही, तर ताश्कंद येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाईल. रविवार, ५ एप्रिल या स्पर्धेच्या (Boxing Competition) पहिल्या दिवशी स्पर्धेमध्ये महिला बॉक्सरचा गवगवा होताना दिसला.

पहिल्या दिवसाचे निकाल – मुलींचा दमदार खेळ

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या विविध वजन गटांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली

  • ४६ किलो गट: नुसरत फातिमा (लडाख), अंजली (झारखंड), नवरीत (पंजाब), राखी (हरियाणा), हेलांग (अरुणाचल प्रदेश), लावण्या (गोवा) आणि इशिका (महाराष्ट्र) पुढील फेरीत पोहोचल्या.
  • ४८ किलो गट: अलीम (अरुणाचल प्रदेश), खुशवीर (पंजाब), नीती (चंदीगड), सिया (आसाम), निशाली (एसएससीबी), अंजली (बिहार) आणि खुशी (उत्तराखंड) विजयी ठरल्या.
  • ५० किलो गट: अनिता (राजस्थान), प्रिया (कर्नाटक), अंजू (बिहार), शेख फरीना बतुल (तेलंगणा), नैतिक (एसएससीबी), खुशी (हरियाणा) विजयी.
  • ५२ किलो गट: अथिना (केरळ), नीलम (जम्मू आणि काश्मीर), यांशिका (हरियाणा) आणि इंदिवरा सिंग (उत्तर प्रदेश) पुढील फेरीत पोहोचले.
  • ५४ किलो गट : मेहक (चंदीगड), रितिका श्री, सोनम चोडेन (सिक्कीम), आणि सुचित्रा देवी (मणिपूर) विजयी.
  • ५७ किलो गट: मंदीशा (आंध्र प्रदेश), साक्षी (हरियाणा), श्रवण पाटील (कर्नाटक), अनुष्का (उत्तराखंड) आणि अशिता (मध्य प्रदेश) यांनी चमकदार कामगिरी केली.
  • ६० किलो गट: झैनब (पश्चिम बंगाल), गणिता देवी (मणिपूर) आणि जागृती (उत्तर प्रदेश) यांनी पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले.

(हेही वाचा Boxing Championships : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ)

नागपूरमध्ये बॉक्सिंगचा उत्सव

या भव्य उद्घाटनानंतर नागपूर शहरातील बॉक्सिंगचा उत्साह गगनाला भिडला आहे. पहिल्या दिवसापासून खेळाडूंच्या दमदार कामगिरीने स्पर्धेला (Boxing Competition) अत्यंत रोमांचक बनवले आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला (Boxing Championships)  रविवारी एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धकांमध्ये नवा जोश आला. या शुभारंभ प्रसंगी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव प्रमोद कुमार, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे वरीष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव राकेश तिवारी, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष मिलन वैद्य यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषा कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.