झोप किंवा ओव्हरस्पीडिंग नाही! ऋषभने स्वत: सांगितले अपघाताचे खरे कारण; DDCA च्या संचालकांनी दिली माहिती

122

भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघाताची दखल पंतप्रधान मोदींपासून, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू ते बीसीसीआयने सुद्धा घेतली आहे. ऋषभ पंतच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर अनेकांनी अपघातासाठी ओव्हरस्पीडिंग हे कारण असू शकते का असा अंदाज अनेकांनी लावला, तर काहींनी ऋषभचा डोळा लागला म्हणून अपघात झाला असावा असे अनेक तर्क लावण्यात आले परंतु आता खुद्द ऋषभ पंतने अपघातामागचे खरे कारण सांगितले आहे.

( हेही वाचा : माथेरानला पर्यटकांची पसंती! मिनी ट्रेनच्या विशेष ४ फेऱ्या )

ऋषभ पंतने दिली माहिती 

रुरकी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सध्या पंत देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात ऋषभ पंतला भेटण्यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) ची टीम पोहोचली आहे. गाडी चालवत असताना समोर एक खड्डा आला, हा खड्डा वाचवत असताना हा अपघात झाल्याची माहिती खुद्द ऋषभ पंतने दिली आहे असे डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले.

डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताचे कारण विचारले यावेळी रात्रीची वेळ होती समोर मला खड्ड्यासारखे काहितरी दिसले हा खड्डा वाचविण्याचा प्रयत्न मी केला आणि तेव्हा अपघात झाल्याची माहिती ऋषभ पंतने श्याम शर्मा यांना दिली. तसेच सध्या ऋषभला एअरलिप्ट करण्याची गरज नाही. त्याला लेगामेंट उपचारासाठी लंडनला जायचे असेल तर त्याचा निर्णय BCCI घेईल असेही श्याम शर्मा म्हणाले.

ऋषभ पंत दिल्लीवरून रुरकी येथे आपल्या घरी आईला भेटण्यासाठी जात होता. दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.