R Praggnanandhaa : आर प्रग्यानंद आणि त्याची बहीण वैशालीचा बुद्धिबळात अनोखा विक्रम

आर प्रग्यानंदची मोठी बहीण वैशाली रमेशबाबूने ग्रॅडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे प्रग्यानंद आणि वैशाली हे जगातील पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ ठरले आहेत. 

177
R Praggnanandhaa : आर प्रग्यानंद आणि त्याची बहीण वैशालीचा बुद्धिबळात अनोखा विक्रम
R Praggnanandhaa : आर प्रग्यानंद आणि त्याची बहीण वैशालीचा बुद्धिबळात अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

आर प्रग्यानंदची मोठी बहीण वैशाली रमेशबाबूने ग्रॅडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे प्रग्यानंद आणि वैशाली हे जगातील पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ ठरले आहेत. (R Praggnanandhaa)

आर प्रग्यानंदची बहीण वैशाली रमेशबाबूने २,५०० एलो गुणांचा टप्पा पार करत ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे आणि ही कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे. एलोब्रेगाट स्पर्धेत तिने हा मान मिळवला. त्याचबरोबर ती विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवेली यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. याच पंक्तीत तिचा भाऊ प्रग्यानंदही आहे आणि दोघं जगातील पहिले बहीण-भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत. (R Praggnanandhaa)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी वैशालीच्या कामगिरीची दखल घेत ट्टिटर खात्यावर तिचं जाहीर अभिनंदन केलं आहे. (R Praggnanandhaa)

(हेही वाचा – Tree Plantation : मालाड चारकोप नाका परिसरात नागरी वन, दहा हजार रोपांचे होणार वृक्षारोपण)

‘अभिनंदन वैशाली! भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. २०२३ हे वर्षं तुझ्यासाठी खूपच चांगलं गेलं आहे. यावर्षी तू आणि तुझ्या भावाने एकाच वेळी कॅम्डिडेट कप या मानाच्या स्पर्धेत प्रवेश मिळवला. ही कामगिरी एकाच वेळी करणारे तुम्ही पहिले भाऊ-बहीण आहात. आता तुम्ही दोघं ग्रॅडमास्टर किताब मिळवणारे पहिले बहीण-भाऊ ठरले आहात. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे,’ असं स्टॅलिन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. (R Praggnanandhaa)

ग्रँडमास्टर किताब पटकावण्यासाठी आवश्यक तीन निकष वैशालीने आधीच पार केले होते. आता एलोब्रेगाट स्पर्धेत तिने २,५०० एलो गुणांचा टप्पाही ओलांडला. त्यामुळे तिचं ग्रँडमास्टर होणं निश्चित झालं. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोनवल्ली यांच्या पाठोपाठ ही मजल मारणारी ती तिसरी महिला भारतीय आहे. (R Praggnanandhaa)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.