Tree Plantation : मालाड चारकोप नाका परिसरात नागरी वन, दहा हजार रोपांचे होणार वृक्षारोपण

या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. 

341
Tree Plantation : मालाड चारकोप नाका परिसरात नागरी वन, दहा हजार रोपांचे होणार वृक्षारोपण
Tree Plantation : मालाड चारकोप नाका परिसरात नागरी वन, दहा हजार रोपांचे होणार वृक्षारोपण

मालाड (पश्चिम) परिसरात प्रभाग ३४ मध्ये चारकोप नाका (अथर्व महाविद्यालय जवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. (Tree Plantation)

यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूलिंब, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने ६ जातीची १० ते १२ फूट उंचीची १,२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरु, ताम्हण या झाडांचा समावेश असेल. (Tree Plantation)

(हेही वाचा – Election Result 2023 : निकालाआधीच अपक्ष उमेदवारांचे वाढले भाव)

चारकोप नाका (अथर्व महाविद्यालय जवळ) येथील भूखंडावर नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) वृक्षारोपण व इतर संकीर्ण कामांचा लोकार्पण सोहळा रविवारी ३ डिसेंबर २०२३ सकाळी १० वाजता होणार आहे. या सोहळ्यास कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार योगेश सागर, अमृता फडणवीस, खासदार तथा ज्येष्ठ हेमा मालिनी, अभिनेत्री जुही चावला, उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा सोहळा होत आहे. (Tree Plantation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.