PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केले गोल्डन बॉय नीरज चोप्राचे अभिनंदन

गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं

102
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केले गोल्डन बॉय नीरज चोप्राचे अभिनंदन

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक या क्रीडाप्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. नीरज चोप्रा याला ‘गोल्डन बॉय’ या नावाने देखील ओळखले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक ट्विट करून नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. “प्रतिभावान नीरज चोप्राने उत्कृष्टतेचे उदाहरण समोर ठेवले आहे. त्याचे खेळामध्ये असलेले समर्पण, अचूकपणा आणि उत्कटता त्याला केवळ अॅथलेटिक्समध्येच विजेता बनवते असे नाही, तर तो संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.”

(हेही वाचा – Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास)

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. रविवार (२७ ऑगस्ट) मध्यरात्री नीरजने देशाला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र नीरजने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८८.१७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. संपूर्ण सामन्यात कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आला नाही.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं कडवं आव्हान!

या वेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला (Neeraj Chopra) मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, त्याला मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक जिंकलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.