Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रॅक आणि फील्ड प्रकारात भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे.

96
Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. रविवार (२७ ऑगस्ट) मध्यरात्री नीरजने देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र नीरजने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८८.१७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. संपूर्ण सामन्यात कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आला नाही.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं कडवं आव्हान!

या वेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला (Neeraj Chopra) मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, त्याला मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक जिंकलं.

(हेही वाचा – Shravan Special : भगवान शंकराने घेतले ‘हे’ दिव्य अवतार, वाचा अलौकिक महत्त्व)

हंगेरी मध्ये झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२७ ऑगस्ट) झाला.

नीरज (Neeraj Chopra) सोबतच भारताच्या डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही भालाफेकच्या अंतिम फेरीत पदकासाठी झुंज दिली. पण किशोर पाचव्या आणि मनू सहाव्या स्थानावर राहिला.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रॅक आणि फील्ड प्रकारात भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. या प्रकारात गोल्ड मेडल जिंकणारा (Neeraj Chopra) नीरज पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक पटकावलं होतं.

नीरज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी देखील पात्र झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.