महाराष्ट्राच्या खेळाडूंची 9 सुवर्ण पदकांची कमाई

74

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना एकूण नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राला योगासनांत पाच, वेटलिफ्टिंगमध्ये तीन, सायकलिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले.

या खेळाडूंनी कमावली पदके

ताऊ देवीलाल स्टेडिअममध्ये रविवारी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची कमाई केली. पारंपारिक योगा प्रकारात सुमित भंडारे, आर्टिस्टिक दुहेरीत वैदेही मयेकर आणि युगांका राजम, मुलांच्या आर्टिस्टिक दुहेरीत आर्यन खरात आणि निबोध पाटील, मुलांच्या रिदमिक योगामध्ये नानक अभंग आणि अंश मयेकर, मुलींमध्ये स्वरा गुजर आणि गीता शिंदे, पारंपारिक योगा प्रकारात तन्वी रेडीज यांनी चमक दाखवली.

वेटलिफ्टिंगमध्ये काजल सलगर, तसेच मुकुंद आहेर आणि हर्षदा गरुड यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. सायकलिंगमध्ये टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे, स्क्रॅच शर्यतीत पूजा दानोळे, सांघिक स्प्रिंटमध्ये आदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे यांनीही पदके पटकावली. कुस्तीमध्ये प्रगती गायकवाडने रौप्यपदक आपल्या नावे केले. तसेच, गौरी पाटील आणि धनश्री फंड यांनी कांस्यपदके पटकावली.

( हेही वाचा: कर्ज घेणे महागणार? रिझर्व्ह बॅंक रेपो दरात आणखी वाढ करणार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.