कंटेनर डेपोमध्ये भीषण आग; ४९ जणांचा मृत्यू

106

बांगलादेशात दक्षिण-पूर्व भागात एका खासगी रासायनिक कंटेनर डेपोत शनिवारी रात्री स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत 49 जणांचा मृत्यू झाला, तर 450 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर बचाव करायला गेलेले लोकसुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडले. चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागातली बीएम कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री आग लागली.

जखमींवर उपचार सुरु

या स्फोटानंतर घटनास्थळाजवळील घरांच्या खिडक्यांच्या काटा फुटल्या. चटगाव अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा विभागाने सहायक संचालक मोहम्मद फारुक हुसैन सिकंदर यांनी सांगितले की, अग्निशमनची जवळपास 19 वाहने आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत होती. तसेच, 6 अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी हजर होत्या. अग्निशमन सेवेचे प्रमुख ब्रिगिडियर जनरल मोहम्मद मैनुद्दीन यांनी सीताकुंड भागात घटनास्थळी सांगितले की, या डेपोत कंटेनरमध्ये हायड्रोजन पॅराक्साइडसारखे अनेक प्रकारची रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले. बहुतांश जखमी लोकांना सीएमसीएचमध्ये भरती करण्यात आले आहे. अग्निशमनचे कर्मचारी आणि अन्य अनेक जखमींवर एका सैन्य हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: शिवसेनेच्या संजयला भाजपचा धनंजय पडणार भारी, फडणवीसांनी सांगितला ‘मास्टर प्लॅन’ )

नेमके काय झाले?

पोलीस उपनिरीक्षक नुरुल आलम यांनी सांगितले की, कंटेनर डेपोत शनिवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा या ठिकाणी स्फोट झाला आणि आग पसरली. रसायनांमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. रात्री 11.45 च्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि कंटेनरमध्ये रसायने असल्याने आग एका कंटेनरमधून दुस-या कंटेनरमध्ये पसरली. या डेपोत कंटेनरमध्ये हायड्रोजन पेरोक्साइडसारखे अनेक प्रकारची रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.