NZ vs Sri : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, पावसाचा फायदा पाकिस्तानला मिळेल का?

या विश्वचषकात गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकासाठी चुरस आहे. त्यामुळे न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संघ पुढील प्रत्येक साखळी सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत.

154
NZ vs Sri : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, पावसाचा फायदा पाकिस्तानला मिळेल का?
NZ vs Sri : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यावर पावसाचं सावट, पावसाचा फायदा पाकिस्तानला मिळेल का?
  • ऋजुता लुकतुके

या विश्वचषकात गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकासाठी चुरस आहे. त्यामुळे न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संघ पुढील प्रत्येक साखळी सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत. (NZ vs Sri)

विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाचा आता एकेक शेवटचा साखळी सामना बाकी आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. उपांत्य फेरीचे पहिले तीन संघ ठरले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी शेवटच्या चारात प्रवेश केलेला आहे. पण, उर्वरित एका जागेवर न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं लक्ष आहे. (NZ vs Sri)

भारतात सगळ्यांना उत्सुकता आहे की, शेजारी देश आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाक संघ उपांत्य फेरीत पोहोचतो का? कारण तसं झालं तर कदाचित पुन्हा एकदा भारत-पाक सामन्याची मेजवानी प्रेक्षकांना मिळू शकेल. गंमत म्हणजे इतर संघांचे निकाल आणि निसर्गही काही बाबतीत पाकिस्तानला मदत करताना दिसतोय. (NZ vs Sri)

म्हणजे असं की गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे आणि नेमकं या लढतीवर पावसाचं सावट आहे आणि पाऊस पडून सामना पूर्ण होऊच शकला नाही किंवा पाकिस्तानच्या सामन्यात जसं ४०१ धावंचं आव्हानही पाकिस्तानला डकवर्थ-लुईस नियमानुसार शक्य झालं तर या सामन्यात झालं तर न्यूझीलंडच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. (NZ vs Sri)

याविषयी काय शक्यता आहेत पाहूया..

सध्या न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांचे ८ सामन्यांतून ८ गुण झाले आहेत. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. पाकचा इंग्लंडशी आणि न्यूझीलंडचा शुक्रवारी श्रीलंकेशी. तिघांनीही आपापले सामने जिंकले तर रनरेटवर कोण पुढे जाणार याचा फेसला होईल. अफगाणिस्तानचा रनरेट उणे ०.०३८ असल्यामुळे आणि त्यांचा सामनाही तगड्या संघाबरोबर असल्यामुळे त्यांच्यासमोरचं आव्हान खूप मोठं आहे. (NZ vs Sri)

(हेही वाचा – Air Pollution : दिवाळीत नियमांचे पालन न केल्यास जीवघेणे प्रदूषण होईल ; हवामान खात्याचा इशारा)

न्यूझीलंडचा रन रेट तिघांमध्ये सर्वाधिक म्हणजे ०.३९८ इतका आहे. तर पाकिस्तानचा ०.०३६ पण, बंगळुरूमध्ये शुक्रवारी पाऊसच पडला आणि सामना पूर्णच होऊ शकला नाही तर न्यूझीलंडला एका गुणावर समाधान मानावं लागेल आणि तिथे त्यांची कोंडी होईल. कारण, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान यांच्यापैकी एका संघाने जरी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकला, तरी त्यांचे १० गुण होऊन ते उपांत्य फेरीत पोहोचतील. न्यूझीलंड मात्र ९ गुणांसह स्पर्धेतून बाद होतील. (NZ vs Sri)

पाकिस्तान संघाचा मात्र त्यातून चांगलाच फायदा होणार आहे. कारण, न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर त्यांना इंग्लंड विरुद्ध खूप मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागले, तरंच सरस रनरेटच्या आधारे पुढे चाल करता येईल. पण, न्यूझीलंडचा सामना पावसात वाहून गेला तर पाकला फक्त विजय पुरेसा असेल. ॲक्युवेदर या वेबसाईट नुसार, बंगळूरूमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची शक्यता आहे. तापमान २७ अंश असणार असलं तरी पावसाची शक्यता चक्क ९० टक्के आहे. (NZ vs Sri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.