Water Cut : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी जलवाहिनी वळवणार, ईशान्य मुंबईतील नागरिकांचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद

6350
Water Cut : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी जलवाहिनी वळवणार, ईशान्य मुंबईतील नागरिकांचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंद

मुंबई महापालिकेची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ही गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या मध्ये येत आहे. या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प कामांतर्गत टी विभागामध्ये फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्र पर्यंत असलेल्या ही १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी मुंबई महानगरपालिकेतर्फे वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २४ ते २५ मे २०२४ दरम्यान २४ तासांसाठी एन, एस आणि टी विभागात अर्थात ईशान्य मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Cut)

मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर बाय १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून शनिवार २५ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत म्हणजे एकूण २४ तासांसाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत एन, एस व टी विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. (Water Cut)

या ठिकाणी राहणार पाणीपुरवठा बंंद 

एन विभाग : विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – दिनांक २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

एस विभाग : नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते ३२ व २०३ ते २१७ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) –२५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

एस विभाग : मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी १०.००) –२५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

टी विभाग : मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठा २४ x ७ तास ) –२४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० ते २५ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.