Nitish Kumar : नितीश कुमार यांचे आक्षेपार्ह कृत्य; श्रद्धांजलीसाठीची फुले उधळली

87

सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात भर म्हणून आता त्यांनी आक्षेपार्ह कृत्य केले, ज्यामुळे नितीश कुमार पुन्हा वादात सापडले आहेत.

(हेही वाचा Delhi Artificial Rain : दिल्ली मध्ये प्रदूषणाला रोखण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणार?)

नितीश कुमार हे मंत्री अशोक चौधरी यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी मंत्री अशोक चौधरी यांच्या वडिलांच्या फोटो समोरील फुले वाहिली. त्यानंतर फोटो समोरील फुले उचलून ती त्यांनी मंत्री अशोक चौधरी यांच्या डोक्यावर उधळली. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या या कृत्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या आधी विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांविषयी अत्यंत अश्लील वक्तव्य केले, ज्यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूने टीका होवू लागली. त्यामुळे नितीश कुमार यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती, आता त्यात भर म्हणून नितीश कुमार यांनी वरील आक्षेपार्ह कृत्य केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.