Novak Djokovic : नोवाक जोकोविचने गोरान इव्हानोसेविचबरोबरची भागिदारी का मोडली?

इव्हानोसेविच २००१ चा विम्बल्डन स्टार आहे. शिवाय १९९२, १९९४ आणि १९९८ मध्ये तो उपविजेता ठरला होता.

122
Novak Djokovic : नोवाक जोकोविचने गोरान इव्हानोसेविचबरोबरची भागिदारी का मोडली?
  • ऋजुता लुकतुके

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचने आपला चार वर्षांचा प्रशिक्षक क्रोएशियाचा दिग्गज खेळाडू गोरान इव्हानोसेविचबरोबरचा करार संपल्याचं बुधवारी जाहीर केलं आहे. इव्हानोसेविच २००१ चा विम्बल्डन स्टार आहे. शिवाय १९९२, १९९४ आणि १९९८ मध्ये तो उपविजेता ठरला होता. (Novak Djokovic)

टेनिसमध्ये आता क्ले कोर्ट हंगाम सुरू होणार आहे. आणि त्यापूर्वीच जोकोविचने ही महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि २०१९ पासून दोघं एकत्र काम करत होते. विशेष म्हणजे इव्हानोसेविचच्या मार्गदर्शनाखाली जोकोविचने ९ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. तिशी ओलांडलेल्या जोकोविचने हे साध्या केलं यामुळे हे यश आणखीच उठून दिसतं. पण, आता जोकोविचने एक इन्स्टाग्राम पोस्ट करून त्यात ‘गोरान आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत,’ असा संदेश लिहित दोघांचा एकत्र फोटोही टाकला आहे. (Novak Djokovic)

 

View this post on Instagram

 

A post shared by Novak Djokovic (@djokernole)

(हेही वाचा – Savitri Jindal : काँग्रेसला मोठा झटका; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी दिला राजीनामा)

नोवाक जोकोविच आपल्या विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत

या पोस्टमध्ये जोकोविच आणि इव्हानोसेविच एकत्र ल्युडो खेळताना दिसत आहेत. ‘ऑन-कोर्ट भागिदारी आम्हाला बरेच उतार-चढाव सहन करावे लागले. पण, मैदानाबाहेर आमची मैत्री निखळ होती. आणि टेनिसमध्ये आम्ही थांबत असलो तरी अजूनही आमचा पारचिसीचा खेळ सुरूच राहणार आहे,’ असं जोकोविचने संदेशात म्हटलं आहे. (Novak Djokovic)

नोवाक जोकोविच आपल्या विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्य फेरीत त्याचा प्रवास संपुष्टात आला होता. यानिक सिनरने त्याचा ६-१, ६-२, ६-७ आणि ६-३ असा पराभव केला होता. त्यानंतर विश्रांतीच्या कारणावरून तो मियामी ओपन खेळणार नाहीए. पण, आगामी क्ले कोर्ट हंगामासाठी मात्र तो तयारी करतोय. आणि क्ले कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली फ्रेंच ओपन स्पर्धा २६ मे ते ९ जून दरम्यान होणार आहे. तिथे चौथं विजेतेपद पटकावण्याचा त्याचा प्रयत्न असेल. (Novak Djokovic)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.