Neeraj Chopra : केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं

रौप्यपदकाला गवसणी

114
Neeraj Chopra : केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं

डायमंड लीग 2023 च्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने रौप्यपदक पटकावलं आहे. केवळ 0.44 सेंटीमीटरच्या फरकानं नीरज चोप्रा याचे सुवर्णपदक हुकले अन् नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं सुवर्णपदक जिंकलं.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भालाफेक केली. अंतिम फेरीतील नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु नीरज 83.80 मीटरच्या पुढे जाऊ शकला नाही. अशातच चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं शेवटच्या प्रयत्नात 84.27 मीटर भालाफेक केली आणि जाकुब वादलेचनं सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

(हेही वाचा – ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी)

फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरनं 83.74 मीटर भालाफेक केली आणि त्यानं तिसरं स्थान पटकावलं. डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्रा (Neeraj Chopra) फॉर्ममध्ये दिसला नव्हता. नीरज चोप्राला दोन प्रयत्नांत स्कोअर करता आला नाही. यानंतर नीरज चोप्रानं उर्वरित 4 प्रयत्नांत 83.80 मीटरचे अंतर पार केले. मात्र, त्यानंतरचे थ्रो अगदी सामान्य होते. चेक रिपब्लिकच्या जाकुब वादलेचनं पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर पार करून (Neeraj Chopra) नीरज चोप्राला मागे टाक आघाडी घेतली.

फायनल्समध्ये कोणत्या अॅथलिटनं किती दूर भालाफेक केली?

1. जाकुब वादलेच (चेक रिपब्लिक) : 84.24 मीटर

2. नीरज चोप्रा (भारत) : 83.80 मीटर

3. ओलिवर हेलँडर (फिनलँड) : 83.74 मीटर

4. एंड्रियन मर्डारे (मोल्डोवा) : 81.79 मीटर

5. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) : 77.01 मीटर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.