Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी

बस मुंबईहून राजापूरकडे निघाली होती.

149
ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी
ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी

 मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या एसटी बसची ट्रकला धडक बसल्याने अपघात झाला. हा  अपघात माणगावजवळच्या रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता झाला.

या अपघातात एक जण ठार, तर 19 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी निघाले होते. ही बस मुंबईहून राजापूरकडे  निघाली होती.

(हेही वाचा – Kokan Ganeshotsav 2023 : रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या ६ तास उशीरानं)

भंडारा पाऊस
भंडाऱ्यातील वैनगंगा नदिला आलेल्या पुरामुळे सर्वत्र हाहाकार माजला. बॅक वॉटरच्या पाण्याने खमारी येथील नाला ओसंडून वाहू लागला आहे. नाल्यावरून पुराचे पाणी 3 फुटावरून वाहू लागलं. त्यामुळे करडी- भिलेवाड़ा मार्ग बंद झाला. शिवाय तब्बल 15 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला.

जळगाव पाऊस
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे निंबोल ऐनपूर गावाजवळील तापी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी निंबोल ऐनपूर गावातील अनेक घरात घुसलं. तसेच रावेर तालुक्यातील इतर गावांशी देखील संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे तापी नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचेदेखील मोठे नुकसान झालं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.