Aditi Ashok : देशातील अव्वल गोल्फपटू अदिती अशोकला खुणावतंय आशियाई सुवर्ण

एरवी अदितीने मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत महिला व्यावसायिक गोल्फ टूअर आणि युरोपीयन टूअर गाजवल्या आहेत.

227
Aditi Ashok : देशातील अव्वल गोल्फपटू अदिती अशोकला खुणावतंय आशियाई सुवर्ण
Aditi Ashok : देशातील अव्वल गोल्फपटू अदिती अशोकला खुणावतंय आशियाई सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

टोकयो ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात कांस्य पदक हुकलेली भारतीय गोल्फपटू अदिती अशोकने आशियाई क्रीडास्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तिथे सुवर्ण जिंकण्याची ईर्ष्या तिने बाळगली आहे. टोकयो ऑलिम्पिकनंतर भारतीय गोल्फपटू अदिती अशोक फारशी चर्चेत नव्हती. पण, याचा कारण देशात गोल्फ या खेळाचीच फारशी चर्चा नसते. एरवी अदितीने मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत महिला व्यावसायिक गोल्फ टूअर आणि युरोपीयन टूअर गाजवल्या आहेत. हंगामातील पहिली स्पर्धा तिने जिंकली होती. आणि इतर सर्व स्पर्धांमध्ये तिने कायम पहिल्या दहात स्थान राखलं आहे. त्यामुळे आता २५ वर्षीय अदितीची नजर आशियाई क्रीडास्पर्धेवर आहे. अदिती ३ जणांच्या महिला गोल्फ संघाचं नेतृत्व करत आहे. तिच्या साथीला आहेत १६ वर्षांची अवनी प्रशांत आणि प्रणवी उर्स. तिघांमध्ये अनुभवी असलेली अदिती पदकाचीच अपेक्षा बाळगून आहे.

‘मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. सध्या खेळही चांगला होतोय. त्यामुळे माझ्या क्षमते एवढा खेळ मी केला तर कुठल्याही स्पर्धेत मी पदक जिंकू शकते,’ अदितीने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. एकदा स्पर्धेच्या ठिकाणी असलेलं वातावरण, हवामान आणि परिस्थिती यांचा अंदाज आला की रणनिती आखणं आणि स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करणं सोपं जाईल असं अदितीला वाटतं. ‘भोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेतला की, पुढचं माझं काम आहे ते क्षमतेनुसार खेळ करणं. ४ ते ५ फेऱ्यांमध्ये चांगला खेळ झाला तर पदक विजेती कामगिरी सहज घडू शकेल,’ अदितीचं बोलणं इतकं आश्वासक आणि आत्मविश्वासाने भरलेलं होतं.

(हेही वाचा – Indian Army Killed Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये ‘या’ जिल्ह्यांत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश)

कुठल्याही स्पर्धेकडे अदिती एक प्रक्रिया म्हणून बघते. त्यामुळे तिला आशियाई स्पर्धेचं वेगळं दडपण घेण्याची गरज वाटत नाही. एखाद्या व्यावसायिक टूअर सारखंच ती याच्याकडे बघते. ‘देशाचं प्रतिनिधित्व करणं हे अभिमानास्पद आहे. पण, म्हणून वेगळं दडपण मी धेणार नाही. एखाद्या टूअर सारखंच नियोजन मी आशियाई स्पर्धेचंही करते,’ अदितीने सांगितलं. युरोपीय टूअरवर चार स्पर्धा जिंकण्याचा अनुभव अदितीकडे आहे. आणि ती दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धा खेळणार आहे. यापूर्वी १६ व्या वर्षी ती इंचियन इथं खेळली होती. १९८२ पासून आशियाई खेळांमध्ये गोल्फचा समावेश आहे. पण, फक्त हौशी गोल्फपटूच इथं खेळू शकत होते. अदितीही इंचियनमध्ये हौशी गोल्फपटू म्हणूनच सहभागी झाली होती. पण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं अलीकडेच व्यावसायिक गोल्फपटूंना ऑलिम्पिकची कवाडं उघडी केल्यानंतर गोल्फची व्याप्ती वाढली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.