Multan Cricket Stadium : वीरेंद्र सहवागच्या ३०९ धावांमुळे गाजलेलं मुलतान क्रिकेट स्टेडिअम कसं आहे?

Multan Cricket Stadium : खेळपट्टीवरील गवतामुळे हिरवंगार दिसणारं स्टेडिअम अशी मुलतान क्रिकेट स्टेडिअमची ओळख आहे

65
Multan Cricket Stadium : वीरेंद्र सहवागच्या ३०९ धावांमुळे गाजलेलं मुलतान क्रिकेट स्टेडिअम कसं आहे?
Multan Cricket Stadium : वीरेंद्र सहवागच्या ३०९ धावांमुळे गाजलेलं मुलतान क्रिकेट स्टेडिअम कसं आहे?
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानमधील मुख्य शहर असलेल्या मुलतानमधील माती ही त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. पाण्यात भिजवून चेहऱ्यावर तिचा लेप लावण्याची पद्धत आहे. मुलतानच्या क्रिकेट मैदानावर मात्र या मातीचा भले भले फलंदाज धसका घेतात. कारण, मैदानावर आणि खेळपट्टीवर गवत ठेवलं जातं. आणि त्यामुळे चेंडूंना अनियमित उसळी मिळते. आणि काही वेळा ही खेळपट्टी भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवते. भारताचा तडाखेबाज सलामीवीर वीरेंद्र सहवागच्या (Virender Sehwag) मात्र या मैदानावर अतिशय सुखद आठवणी आहेत. (Multan Cricket Stadium)

(हेही वाचा- Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या)

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हे प्रमुख क्रिकेटचं मैदान आहे. आणि आधीच्या इब्न – ए – कासिम बाग मैदानाच्या जागी २००१ मध्ये हे नवीन स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मालकीचं असलेलं हे स्टेडिअम ३५,००० प्रेक्षकांना सामावून घेऊ शकतं. २००१ मध्ये आशियाई क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा कसोटी सामना इथं खेळवण्यात आला होता. आणि तोच सामना इथं झालेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना. (Multan Cricket Stadium)

अगदी अलीकडे पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही ३ सामने या मैदानावर झाले होते. पण, भारतासाठी है मैदान खासकरून लक्षात राहिलं आहे ते सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या ३०९ धावांच्या खेळीमुळे २००४ च्या पाकिस्तान दौऱ्यात मुलतान कसोटीत भारताने पाकिस्तान विरुद्ध ५ बाद ६७५ धावांचा डोंगर उभा केला होता. आणि यातील ३०९ धावा या वीरेंद्र सहवागच्या (Virender Sehwag) होत्या. सेहवागच्या बरोबरीने सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) त्या कसोटीत नाबाद २९४ धावा केल्या होत्या. सकलेन मुश्ताकच्या ४३ षटकांत तेव्हा २०३ धावा निघाल्या होत्या. (Multan Cricket Stadium)

(हेही वाचा- Cricket Pitch Length : क्रिकेटच्या खेळपट्टीची मापं, आकार आणि स्वरुप)

पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात ४०७ धावा केल्या खऱ्या. पण, तरीही त्यांना ऑलो – ऑन मिळाला. आणि दुसऱ्या डावात त्यांचा संघ २१६ धावांत बाद झाल्यामुळे भारताने ही कसोटी एक डाव आणि ५२ धावांनी जिंकली. दुसऱ्या डावांत अनिल कुंबळेनं ७२ धावांत ६ बळी मिळवले होते. (Multan Cricket Stadium)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.