ठाणे ग्रामीण विभागीय स्तरावरील क्रिडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडची रायफल शुटींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

114

जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी आयोजीत केलेल्या आयोजित ग्रामीण विभाग स्तरीय रायफल / पिस्तुल शुटींग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या १४ वर्षांखालील संघामधून सहभागी झालेल्या कॅडेट हर्ष हेमंत बंदरकर या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शुटींग स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.

जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी दादोजी कोंडदेव स्टेडीयम ठाणे येथील रायफल शुटींग क्लबमध्ये, शनिवारी,  १७ डिसेंबर रोजी आयोजित ग्रामीण विभाग स्तरीय रायफल / पिस्तुल शुटींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा विभागस्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यासाठी स्कुलचे रायफल व पिस्तुल या खेळाचे प्रशिक्षक संदेश गपाट यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करुन घेतली होती. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या संघाने मिळवलेल्या यशाबद्दल या शाळेचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

( हेही वाचा: TV Channel Rates Increase: आता TV पाहणे महागणार! )

मान्यवरांकडून विजयी संघाचे अभिनंदन 

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाटील, कार्यवाह रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव संस्थेचे सर्व पदाधिकारी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर,  हॉकी प्रशिक्षक राजेंद्र तिवारी, सर्व क्रिडा विभागातील प्रशिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.