Kalyan : चिकणीपाडा मैदानात विठ्ठल सीसी प्रीमिअर लीगचा थरार; साई पॅकर्स संघ ठरला पहिला मानकरी

79
साई पॅकर्स संघाचा विजयी क्षण विठ्ठल प्रीमिअर लीगमध्ये
Kalyan : चिकणीपाडा मैदानात विठ्ठल सीसी प्रीमिअर लीगचा थरार; साई पॅकर्स संघ ठरला पहिला मानकरी
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan                      कल्याण पूर्वेकडे असलेल्या चिकणीपाड्यात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला होता. स्थानिक विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या प्रांगणात विठ्ठल क्रिकेट क्लब आयोजित विठ्ठल प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत दर्शन शेट्ये यांच्या साई पॅकर्स संघाने चमकदार कामगिरी करत पहिल्या-वहिल्या चषकावर आपले नाव कोरले. (Kalyan)

​चिकणीपाडा परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही व्यावसायिक शिरकाव नव्हता. केवळ चिकणीपाडा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या खेळाडूंसाठीच ही स्पर्धा मर्यादित ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी झाले होते. साई पॅकर्स, साईशा स्ट्राईकर्स, अविरा चॅलेंजर्स आणि टीम एसएम सिक्स ​या संघांमध्ये एकूण १२ साखळी सामने खेळविण्यात आले. प्रत्येक संघाने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. (Kalyan)

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway १० पदरी होणार, मात्र टोल वसुलीच्या कालावधीत वाढ; कारण…)

ओमकार शिंदे ठरला मालिकावीर

गुणतालिकेत अव्वल ठरलेल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला. अंतिम सामन्यात दर्शन शेट्ये यांच्या साई पॅकर्स संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला. संघाचा अनुभवी कर्णधार ओमकार शिंदे याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळवून दिला. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्टीत रंगलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण चिकणीपाडा परिसरात उत्साहाचे वातावरण होते. (Kalyan)

(हेही वाचा – पलंगावर नोटांचे गठ्ठे, त्यावर डॉ. अफझल झोपलेला…कानपूर Kidney Racket मधील आरोपींचा व्हिडिओ व्हायरल)

आयपीएल धर्तीच्या लिलावात ५० खेळाडू सहभागी

पहिल्या हंगामाच्या अभूतपूर्व यशानंतर परिसरातील तरूणांमध्ये क्रिकेटची क्रेझ वाढली असून पुढच्या हंगामात मैदानात आपली चमक दाखविण्यासाठी खेळाडूंनी आतापासूनच सराव सुरू केला आहे. व्यावसायिक स्वरूप नसले तरी स्पर्धेचे अत्यंत नियोजन उत्तमोत्तम पद्धतीने करण्यात आले होते. परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी संघांची मालकी स्वीकारली होती. या स्पर्धेसाठी दोन आठवड्यांपूर्वी खेळाडूंचा लिलाव पार पडला. ज्यामध्ये ५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.