Mumbai-Pune Expressway १० पदरी होणार, मात्र टोल वसुलीच्या कालावधीत वाढ; कारण…

149
Mumbai-Pune Expressway १० पदरी होणार, मात्र टोल वसुलीच्या कालावधीत वाढ; कारण...

Mumbai-Pune Expressway                   मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीच्या समस्यांना प्रवाशांना सातत्याने सामोरे जावे लागते. आठवड्याच्या शेवटी शनिवारी-रविवारी तर गाड्यांच्या रांगा या मार्गावर लागलेल्या पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वीच टँकर उलटल्यामुळे ३२ तास वाहतूक कोंडी झाली होती. सततच्या वाहतूककोंडीनंतर प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळेल, अशी आशा आहे. यासाठी येत्या पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला (Mumbai-Pune Expressway) १० पदरी करण्याचं काम सुरू होणार आहे. (Mumbai-Pune Expressway)

एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी याविषयी सांगितले की, महामार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम हाती घेतलं जाणार आहे. यावर्षी काम सुरू झालं तर हा प्रकल्प पुढील ३ वर्षांनी पूर्ण होईल. आधीपासून आवश्यक जमीन उपलब्ध असल्यामुळे २०२९-३० पर्यंत महामार्गाचा विस्तार पूर्ण होईल. (Mumbai-Pune Expressway)

(हेही वाचा – Green Asha Ship: २० हजार टन गॅससह ‘ग्रीन आशा’ने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी)

टोलवसुलीचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या ९४.६ किमी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. २०२६मध्ये सुरू झालेले हे काम २०२९-३०पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या रुंदीकरणाच्या अर्थसाहाय्यासाठी अधिकाऱ्यांनी हायवेवरील टोल वसुलीचा कालावधी १५ वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे २०४५ या वर्षी असलेली अंतिम मुदत २०६० होण्याची शक्यता आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पासाठी (budget) कोणतीही तरतूद नाही त्यामुळे एमएसआरडीसी (MSRDC) ला (Maharashtra State Road Development Corporation) स्वतंत्रपणे निधी उभा करावा लागणार आहे. (Mumbai-Pune Expressway)

(हेही वाचा – IPL 2026 : कोलकाताने २५ कोटी रुपये देऊन खरेदी केलं; पण, पठ्ठा गोलंदाजीच करत नाही)

१३ किमी लांब ‘मिसिंग लिंक’ मार्ग

या प्रकल्पासाठी एकूण १४,२६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज अंदाजे ६५,००० वाहने हाताळली जातात. वीकेंडला तर ही संख्या एक लाखावर पोहोचते. तसेच, दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांनी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. येत्या मे महिन्यात १३ किमी लांब ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू होणार आहे. हा रस्तासुद्धा १० पदरी असून खंडाळा घाटातून जाणाऱ्या या मार्गामुळे नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण तरीही वाहनांची वाढती संख्या पाहून द्रुतगती मार्गाचंही रुंदीकरण आवश्यक आहे. (Mumbai-Pune Expressway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.