IPL Mega Auction : संपूर्ण लिलावापूर्वी संघांना ४ ऐवजी ८ खेळाडू राखून ठेवता येणार?

IPL Mega Auction : आयपीएल फ्रँचाईजींच्या संघात स्थिरता यावी यासाठी बीसीसीआय असा विचार करत आहे. 

86
IPL Mega Auction : संपूर्ण लिलावापूर्वी संघांना ४ ऐवजी ८ खेळाडू राखून ठेवता येणार?
  • ऋजुता लुकतुके

या आयपीएलच्या हंगामानंतर २०२४ च्या शेवटी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी फ्रँचाईजींना किती खेळाडू आपल्याकडे राखण्याची मुभा द्यावी यावर आता दबक्या आवाजात पण, खरपूस चर्चा रंगत आहे. आधीच्या नियमानुसार, दर तीन वर्षांनी होणाऱ्या खेळाडूंच्या मेगा लिलावापूर्वी ताफ्यातील ४ खेळाडू फ्रँचाईजींना आपल्याकडे राखता येत होते. उर्वरित सर्व खेळाडू लिलावासाठी मोकळे करावे लागत होते. (IPL Mega Auction)

खेळाडूंना त्यांचा सुयोग्य मोबदला मिळावा, स्पर्धेतील चुरस वाढावी आणि फ्रँचाईजी तसंच खेळाडूंनाही समान संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. पण, आता ४ खेळाडूंचा नियम काहींना जाचक वाटतोय. दर तीन वर्षांनी मोठा लिलाव होत असल्यामुळे संघाची घडी बिघडते. आणि खेळाडूंनाही नवीन संघांबरोबर जुळवून घेण्याचया दिव्यातून जावं लागतं, असं काही फ्रँचाईजींना वाटतंय. त्यामुळे ४ खेळाडूंऐवजी किमान ८ खेळाडू संघात कायम राखण्याची मुभा मिळावी, असा एक विचार समोर येत आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM Modi; मतदारांनी ठरवावे कुणाला मत द्यायचे? फडणवीसांचे आवाहन)

बीसीसीआयकडून याविषयी निर्णय घेतला जाणार

आणि त्यावर बीसीसीआय तसंच फ्रँचाईजी यांच्यामध्ये चर्चाही सुरू असल्याचं समजतंय. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्याच आठवड्यात अहमदाबाद इथं १० फ्रँचाईजी मालक आणि बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्यात बैठकही होणार आहे. ‘खरंतर बीसीसीआय आणि फ्रँचाईजी यांच्याबरोबरची ही नियमित बैठक आहे. लीग कशाप्रकारे पुढे सुरू रहावी, यावर बोर्ड फ्रँचाईजींशी चर्चा करत असतं. आणि अशीच एक बैठक अहमदाबादला आहे. पण, खेळाडूंना कायम राखण्यावर या बैठकीत नक्की चर्चा होणार आहे. कारण, तो मुद्दा काहींनी खाजगीत बोलूनही दाखवला आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलून दाखवलं आहे. (IPL Mega Auction)

या आधीच्या लिलावापर्यंत संघांनी ४ खेळाडू आपल्याकडे राखून ठेवता येत होते. आणि लिलावानंतर आणखी एक खेळाडू ‘राईट टू मॅच’ या नियमाअंतर्गत परत बोलावता येऊ शकत होता. म्हणजे एकूण पाच खेळाडू फ्रँचाईजी कायम राखू शकत होत्या. दोन परदेशी खेळाडू कायम राखण्याची मुभा संघांना होती. आता हे प्रमाण ८ असावं अशी काही फ्रँचाईजींचीच इच्छा आहे. पण, मागच्या चार वर्षांत आयपीएल लीग विस्तारलीय आणि नवीन दोन फ्रँचाईजी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही खेळाडू मिळवण्याची समान संधी मिळणं आवश्यक आहे. हा सगळा विचार करून बीसीसीआयकडून याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.