उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM Modi; मतदारांनी ठरवावे कुणाला मत द्यायचे? फडणवीसांचे आवाहन

116

मुंबईच्या मतदारांनी हे लक्षात घ्यावे की त्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचे बटण दाबले तर त्यांचे मत PM Modi यांना जाणार आहे, परंतु त्यांनी जर उबाठाला अर्थात महाविकास आघाडीला मत दिले तर त्यांचे मत राहुल गांधी यांना जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुणाला मत द्यायचे हे ठरवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ एका सभेत फडणवीस बोलत होते.

पंतप्रधान मोदींनी १० वर्षात जे परिवर्तन केले, मजबूत भारत तयार केला. काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट हवी तशी वक्तव्ये करतात ती पाहून मला आश्चर्य वाटते. उद्धव ठाकरेंचे नेते कोण, तर राहुल गांधी. कांग्रेसचे नेते कोण तर राहुल गांधी. आमच्यासह महायुतीचे नेते कोण तर PM Modi . आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण इंडि आघाडी तयार झाली आहे, त्यात प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो. आम्ही मोदींच्या (PM Modi)  नेतृत्वात काम करतो आहोत. विकासाची ट्रेन पुढे घेऊन जातो आहोत. मुंबईकरांनी विचार करायचा आहे की, नरेंद्र मोदींच्या ट्रेनमध्ये बसायचे की राहुल गांधींच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.

(हेही वाचा Rashmi Barve यांची उमेदवारी रद्दच; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली)

दरम्यान, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी (PM Modi) जो विकास केला, तो फक्त ट्रेलर होता. येत्या ५ वर्षांत मुंबईसह देशाचा विकास नरेंद्र मोदी करणार आहेत. उद्धव ठाकरेंकडे २५ वर्षे मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी केलेले एक काम दाखवावे. पियूष गोयल हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी उत्तर मुंबईतून निवडून येतील, असेही फडवणीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.