Sandeshkhali Case प्रकरणातील शाहजहान शेखची आता सीबीआय करणार चौकशी; कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने संदेशखालीचामुख्य आरोपी शाहजहानच्या विरोधात 5 जनहित याचिकांवर सुनावणी केली.

100

संदेशखली (Sandeshkhali Case)  येथील महिलांचा लैंगिक छळ करणारा टीएमसीचा नेता शाहजहान शेख याची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणात टीएमसीचे तीन नेते शाहजहान शेख याच्यासह शिबू हाजरा आणि उत्तम सरदार हे आरोपी आहेत.

मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने संदेशखालीचा (Sandeshkhali Case) मुख्य आरोपी शाहजहानच्या विरोधात 5 जनहित याचिकांवर सुनावणी केली. सीबीआयचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. सीबीआय तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहे. या प्रकरणी 2 मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखली (Sandeshkhali Case) येथे महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेला  टीएमसी नेता शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी २९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सीबीआयच्या ताब्यात दिले.

(हेही वाचा Loksabha Election 2024 : ‘द केरला स्टोरी’ केरळमध्ये ठरणार गेमचेंजर ?; प्रक्षेपणाला पुन्हा विरोध

साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्याची मागणी 

या प्रकरणातील साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे अन्य एका जनहित याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव एकही महिला न्यायालयात साक्ष देण्यासाठी पुढे आली नाही, असा दावा त्यांनी केला. तर दुसऱ्या याचिकाकर्त्याच्या वकील प्रियंका टिब्रेवाल म्हणाल्या, ‘बहुतेक महिला निरक्षर आहेत. 500 हून अधिक महिलांनी आमच्याकडे लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत. आमच्याकडे प्रतिज्ञापत्रे आहेत, ज्यात म्हटले आहे की फक्त एक शाहजहानला अटक करण्यात आली आहे. त्याचे 1000 साथीदार गावात फिरत आहेत आणि त्यांना शहाजहानच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी देत आहेत. महिलांनी निवेदन दिल्यास पती आणि मुलांचा शिरच्छेद करून फुटबॉल खेळू, असे हे लोक सांगत असल्याचे यात म्हटले आहे. केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल धीरज त्रिवेदी यांनी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आणि अशा परिस्थितीत केंद्रीय एजन्सी तपास कसा पुढे नेतील असा सवाल केला.(Sandeshkhali Case)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.