Will Google Charge For Searches? गुगल खरंच गुगल सर्चसाठी आपल्याकडून पैसे घेणार का?

Will Google Charge For Searches? गुगल सर्चसाठी आता पैसे मोजावे लागणार अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. खरं काय आहे?

113
Will Google Charge For Searches? गुगल खरंच गुगल सर्चसाठी आपल्याकडून पैसे घेणार का?
  • ऋजुता लुकतुके

गुगल (Google) ही अग्रगण्य टेक कंपनी आता गुगल सर्चसाठी ग्राहकांकडून पैसे घेणार असल्याची बातमी सध्या सगळीकडे पसरली आहे. ग्राहकांना तर हा धक्काच आहे. शिवाय कंपनीने इतकी वर्षं ज्या पद्धतीने धंदा केला आणि पैसे कमावले ती पद्धतही अशी अचानक बदलणार का, असा प्रश्नही त्यामुळे जाणकारांना पडला. गुगलने अंतर्गत पातळीवर सर्चसाठी पैसे मोजण्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू केल्याची बातमी पहिल्यांदा फायनान्सिअल टाईम्सने दिली. (Will Google Charge For Searches?)

‘सर्च इंजिन चालवणं हे खर्चाचं काम आहे. आणि ही सेवा चालवण्यावर होणारा खर्च आता कंपनीला परवडणार नाहीए. त्यामुळे गुगल सर्च ही सेवा प्रिमिअम दर्जाची करावी. आणि त्यासाठी सब्सक्रिप्शन मॉडेल ठेवावं, असं गुगलच्या प्रस्तावात म्हटल्याचं,’ फायनान्सिअल टाईम्सच्या बातमीत म्हटलं होतं. (Will Google Charge For Searches?)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : ‘द केरला स्टोरी’ केरळमध्ये ठरणार गेमचेंजर ?; प्रक्षेपणाला पुन्हा विरोध)

AI टूल वापरणाऱ्यांसाठी सब्सक्रिप्शन मॉडेल तयार करणार 

पण, आता हे स्पष्ट झालं आहे की, इथं गुगल नियमित सर्च नाही तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (artificial intelligence) आधारित सर्चविषयी बोलत आहे. आपण इंटरनेट वापरून जो सर्च करतो त्यावर गुगल कंपनी पैसे आकारणार नाहीए. तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सर्चसाठी कंपनीने नवीन यंत्रणा उभी केली आहे. आणि ती चालवण्यासाठी येणारा अफाट खर्च पाहता, कंपनीने एआय (AI) टूल वापरणाऱ्यांसाठी सब्सक्रिप्शन मॉडेल तयार करण्याचं ठरवलंय. (Will Google Charge For Searches?)

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (artificial intelligence) आधारित मॉडेलसाठी टेक कंपन्या बराच खर्च करत आहेत. अलीकडेच ॲमेझॉनने फक्त ट्रेनिंग सेंटरसाठी ६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले. तर डेटा सेंटर उभारणं, लोकांना प्रशिक्षण देणं आणि प्रत्यक्ष हे टूल विकसित करणं यावरही कंपन्यांचा मोठा खर्च होत आहे. नियमित सर्च इंजिन पेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सर्च इंजिन विकसित करण्याचा खर्चही जास्त आहे. हा सगळा विचार करून सुरुवातीला ही यंत्रणा चालवण्या इतपत पैसे लोकांकडून मिळवावेत, असा गुगलचा प्रयत्न असेल. (Will Google Charge For Searches?)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.