IPL 2024 Riyan Parag : रियान परागच्या पाठीवर सुनील गावसकरांची कौतुकाची थाप

IPL 2024 Riyan Parag : या आयपीएलमध्ये रियान परागने आतापर्यंत ३ अर्धशतकं केली आहेत. 

80
IPL 2024 Riyan Parag : रियान परागच्या पाठीवर सुनील गावसकरांची कौतुकाची थाप
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्सचा रियान पराग या आयपीएलमध्ये भलताच फॉर्ममध्ये आहे. तीन अर्धशतकांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता तो विराट कोहलीच्या मागोमाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानसाठी चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या रियान परागने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे आणि त्यात लिटलमास्टर सुनील गावसकर यांचाही समावेश आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध ४८ चेंडूंत ७४ धावा केल्यानंतर, ‘निवड समितीचं आता त्याच्यावर लक्ष असेल,’ असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. (IPL 2024 Riyan Parag)

तिसऱ्या अर्धशतकानंतर रियान परागच्या ५ सामन्यांत आता २६१ धावा झाल्या आहेत. तर आघाडीवर असलेल्या विराट कोहलीच्या ६ सामन्यांत ३३१९ धावा आहेत. आणि ऑरेंज कॅप विराटकडेच आहे. (IPL 2024 Riyan Parag)

(हेही वाचा – IPL 2024 Virat Kohli : विराट कोहलीला कशाची भीती वाटते?)

सुनील गावसकरांनी रियानला दिलं हे नाव 

‘क्रिकेटमध्ये असंच असतं. तुम्हाला अचानक संधी मिळून जाते आणि तुम्ही त्या संधीचं सोनं करता. त्याची आताची कामगिरी निवड समितीला दखल घ्यायला लावण्यासारखीच आहे. कारण, तो फक्त फलंदाजी करत नाहीए, तर क्षेत्ररक्षणही उत्तम आहे. आणि तो संघ सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करतो,’ असं सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले. (IPL 2024 Riyan Parag)

सुनील गावसकर यांनी रियान परागला ‘मिक्स्ड पकोडा’ असं नावही दिलं आहे. घणाघाती फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि परिणामकारक गोलंदाजी करण्याची क्षमता गावसकर यांना महत्त्वाची वाटते. राजस्थान रॉयल्ससाठी रियान पराग ही या हंगामाची देणगी आहे, असंही गावसकर यांनी बोलून दाखवलं आहे. (IPL 2024 Riyan Parag)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.