IPL 2024, Rishabh Pant : रिषभ पंतला २४ लाखांचा दंड का झाला?

IPL 2024, Rishabh Pant : षटकांची गती राखली नाही म्हणून कर्णधाराला २४ लाखांचा दंड होतो?

142
IPL 2024 Rishabh Pant : रिषभ पंतची दिनेश कार्तिकच्या 'या' विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्यादरम्यान षटकांची गती राखली नाही म्हणून दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला २४ लाख रुपयांचा दंड आयपीएल प्रशासनाकडून ठोठावण्यात आला. दिल्ली संघाने आतापर्यंत दुसऱ्यांदा षटकांची योग्य गती राखली नव्हती. म्हणजेच एकच चूक त्यांनी दोनदा केली होती. पण, तरीही कर्णधाराला तब्बल २४ लाखांचा दंड बसावा यामुळे या कारवाईची चर्चा होत आहे. म्हणूनच आयपीएलचा या विषयीचा नियम समजून घेऊया. (IPL 2024, Rishabh Pant)

(हेही वाचा- mahalakshmi mandir kolhapur : अंबाबाई देवीच्या मूर्तीची झीज; अहवालातून धक्कादायक माहिती उघड)

सामना वेळेत संपावा आणि मैदानात खेळाडूंनी जास्त वेळ वाया दवडून निकालावर विपरित प्रभाव टाकू नये, यासाठी २० षटकं किती वेळात पूर्ण करावीत यासाठी क्रिकेटमध्ये नियम आखून दिलेले आहेत. महत्त्वाच्या स्पर्धा आणि क्रिकेटचा प्रकार (एकदिवसीय, टी-२० वगैरे) यानुसारही वेळ बदलतो. आयपीएल ही बीसीसीआयच्या (BCCI) नियंत्रणाखाली भरवली जाणारी प्रथमश्रेणी लीग आहे. आणि स्पर्धेची नियमावली स्वतंत्र आहे.  (IPL 2024, Rishabh Pant)

(हेही वाचा- Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…)

संघाने षटकांची गती न राखण्याची चूक पुन्हा पुन्हा केली तर दंडाची रक्कम वाढत जाते. तेच दिल्लीच्या बाबतीत झालंय. आयपीएलचं प्रसिद्धी पत्रक सांगतं, ‘दिल्ली संघाची षटकांची गती न राखण्याची ही दुसरी खेप आहे. त्यामुळे इम्पॅक्ट खेळाडूसह सर्व खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा मानधनातील २५ टक्के रक्कम यातील जी रक्कम कमी असेल तेवढा दंड करण्यात येत आहे.’ कर्णधार म्हणून पंतच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. (IPL 2024, Rishabh Pant)

इतकंच नाही तर रिषभ पंतच्या संघावर आता सामनाधिकाऱ्यांचं पूर्ण लक्ष असेल. आणि तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) वेळेत गोलंदाजी झाली नाही तर रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. आणि दंडाची रक्कमही वाढून ३० लाख रुपये होईल. तर खेळाडूंच्या मानधनातूनही ३० टक्के किंवा १२ लाख रुपयांची रक्कम कापून घेतली जाईल.  (IPL 2024, Rishabh Pant)

(हेही वाचा- IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant : शाहरुख खानलाही घातली रिषभ पंतच्या ‘नो लूक’ फटक्याने भुरळ )

कोलकाता संघाने (KKR) या सामन्यांत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत २० षटकांत २७७ धावांचा डोंगर रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. (IPL 2024, Rishabh Pant)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.