Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी चंद्रपुरात सभा

129
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी चंद्रपुरात सभा

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी, (८ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी  (Chandrapur )लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे.

सभेसाठी किमान ५ ते ७ हजार वाहने ग्रामीण भागातून येणार असल्याने वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तथा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. भाजप कार्यकर्तेदेखील सभास्थळ पाहून आले आहेत.

(हेही वाचा – IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant : शाहरुख खानलाही घातली रिषभ पंतच्या ‘नो लूक’ फटक्याने भुरळ  ) 

उमेदवारांचीही उपस्थिती
सभेची जय्यत तयारी सुरू असून ती यशस्वी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.