IPL 2024 Pat Cummins : पॅट कमिन्सने दिलेल्या ‘या’ उत्तराने भारतीयांच्या जखमेवर चोळलं मीठ

IPL 2024 Pat Cummins : बंगळुरू विरुद्धच्या विजयानंतर कमिन्सला भारतातील संस्मरणीय आठवण कुठली असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

138
IPL 2024 Pat Cummins : पॅट कमिन्सने दिलेल्या ‘या’ उत्तराने भारतीयांच्या जखमेवर चोळलं मीठ
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्स हैद्राबादचं नेतृत्त्व करणाऱ्या पॅट कमिन्सने इन्स्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये २०२३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला ती भारतातील सर्वाधिक आवडणारी आठवण असल्याचं म्हणत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. पॅट कमिन्सनं चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देताना हे फोटो शेअर केले आहेत. भारतीय क्रिकेट चाहते २०२३ च्या विश्वचषक सामन्यातील पराभव विसरु शकलेले नाहीत. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आस्ट्रेलियानं भारताला पराभूत केलं होतं. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करताना २४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं ते आव्हान चार गडी गमावून पूर्ण केलं होतं. (IPL 2024 Pat Cummins)

पॅट कमिन्सला याशिवाय आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. सनरायजर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रुममधील त्याचा आवडता खेळाडू कोण आहे असं विचारलं असता त्यानं ट्रेविस हेडचा फोटो इन्स्टाग्राम स्टेटसला ठेवला. ट्रेविस हेडनं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली होती. हेडच्या फलंदाजीमुळं ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला होता. कमिन्सनं हैदराबादमधील आवडतं ठिकाण गोवळकोंडा असल्याचं म्हटलं. (IPL 2024 Pat Cummins)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये 13 जागांसाठी चौरंगी मुकाबला; शिअद-भाजपा पहिल्यांदाच स्वतंत्र लढणार)

या कारणामुळे भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांवर फेरलं पाणी

पॅट कमिन्सनं भारतातील आवडता पदार्थ हा पावभाजी असल्याचं म्हटलं आह. याशिवाय काही फॅन्सनी पॅट कमिन्सला वेगवेगळे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये उंची वाढवण्यासाठी काय करावं लागेल. यावर पॅट कमिन्सनं दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला. यानंतर क्रिकेटशिवाय काय खेळायला आवडेल, असं विचारलं असता त्यानं गोल्फ खेळायला आवडेल, असं सांगितलं. पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) यंदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. यावेळी सनरायजर्स हैदराबादनं पाच पैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. (IPL 2024 Pat Cummins)

भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनवेळा आमने सामने आले आहेत. २००३ आणि २०२३ च्या वर्ल्डकपमधील अंतिम फेरीच्या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला ऑस्ट्रेलियानं २००३ च्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत केलं होतं. भारतीय संघ (Indian team) २०२३ ला या पराभवाचा बदला घेईल, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा होती. मात्र, २०२३ च्या विश्वचषक अंतिम फेरीतही भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि करोडो भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. (IPL 2024 Pat Cummins)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.