IPL 2024 M S Dhoni : छोट्या मेहरला धोनीकडून मिळाली एक अनपेक्षित भेट

IPL 2024 M S Dhoni : धोनीच्या ९ चेंडूंत २८ धावांच्या खेळीनंतर तंबूत परतताना धोनीने प्रेक्षकांत बसलेल्या एका मुलीला चेंडू भेट दिला. 

119
IPL 2024 M S Dhoni : छोट्या मेहरला धोनीकडून मिळाली एक अनपेक्षित भेट
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) लखनौच्या एकाना स्टेडिअमवर लखनौ सुपरजायंट्स संघाविरद्ध फलंदाजी करत होता. मुंबईविरुद्ध त्याने ४ चेंडूंत २० धावा केल्या होत्या. तसाच एक डाव तो इथंही खेळला आणि त्याने ९ चेंडूंत २८ धावा करत चेन्नईला १७५ धावांचा टप्पा गाठून दिला. या खेळीनंतर तंबूत परतताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या छोट्या मेहरवर धोनीची नजर गेली. पायऱ्यांवर पडलेला एक क्रिकेटचा चेंडू धोनीने (M S Dhoni) उचलला आणि तो मेहरला भेट म्हणून दिला. मेहर तिच्या वडिलांसोबत हा सामना बघण्यासाठी गेली होती. ही अनपेक्षित भेट बघून ती सुखावली. (IPL 2024 M S Dhoni)

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सने मेहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. यात मेहर या चेंडूंचं काय करणार याचं छान उत्तर तिने दिलं आहे. (IPL 2024 M S Dhoni)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांना वेड लागले ; असे का म्हणाले Devendra Fadnavis ?)

मेहरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया 

या व्हिडिओत मेहरचे वडीलही आहेत आणि त्यानंतर मेहर चेन्नईची सात क्रमांकाची जर्सी घालून मैदानात क्रिकेट खेळतानाही दिसते. ७ क्रमांकाची जर्सी अर्थातच धोनीची (M S Dhoni) आहे. पुढे ती म्हणते, ‘मी हा चेंडू कुणाला म्हणून देणार नाही. पुढे मी क्रिकेट खेळणार आहे आणि मी भारतासाठी क्रिकेट खेळणार.’ (IPL 2024 M S Dhoni)

हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून ते आतापर्यंत दीड हजार लोकांनी लाईक केलं आहे. लखनौ विरुद्ध चेन्नई सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रवींद्र जाडेजाच्या ५४ धावा आणि धोनीच्या नाबाद २८ धावांमुळे चेन्नईने लखनौसमोर विजयासाठी १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं. पण, हे आव्हान लखनौने सहा चेंडू आणि ८ गडी राखून पूर्ण केलं. लखनौचा कर्णधार के एल राहुलने ५३ चेंडूंत ८२ धावांची खेळी साकारली. तर क्विंटन डी कॉकनेही अर्धशतक झळकावलं. (IPL 2024 M S Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.