IPL 2024 Mumbai Indians : हार्दिक पांड्या जेव्हा विमानतळावर पियुष चावलाच्या मुलाला सांभाळतो

IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या विमानतळावर पियुष चावलाचा मुलगा अद्विकशी कॅच-कॅच खेळताना दिसला. 

115
IPL 2024 Mumbai Indians : हार्दिक पांड्या जेव्हा विमानतळावर पियुष चावलाच्या मुलाला सांभाळतो
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL) ही स्पर्धाच इतकी धामधुमीची आहे की, खेळाडूंचा सगळा वेळ स्पर्धा, सराव आणि प्रवासातच जातो. या दरम्यान खेळाडू आपला फावला वेळ आणि करमणूक शोधून काढतात. मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या पुढील सामन्यासाठी जयपूरला रवाना झाली आहे. या विमान प्रवासापूर्वी विमानतळावर मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याचा संघ सहकारी पियुष चावलाचा मुलगा अद्विक हे दोघं कॅच-कॅच खेळत वेळ धालवताना दिसले. मुंबई इंडियन्स संघाने सोशळ मीडियावर हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. विमानतळावर वेळ कसा घालवाल? असा मथळा त्यांनी या व्हीडिओला दिला आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

(हेही वाचा – Election : अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकता आणि मतदानही करू शकता; काय म्हटले निवडणूक आयोगाने?)

मुंबईचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सशी येत्या २२ एप्रिलला होणार आहे. तर सुरुवातीच्या तीन पराभवांनंतर मुंबईचा संघ आता सावरला आहे. आणि ७ पैकी ३ सामने जिंकून मुंबईने गुणतालिकेतही सातव्या क्रमांकावर आगेकूच केली आहे. पंजाब विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मुंबईने मोक्याच्या क्षणी विजय खेचून आणला आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका होत असली तरी जसप्रीत बुमरा आणि गेराल्ड कोत्झीएची तेज गोलंदाजी तसंच सुर्यकुमारच्या समावेशानंतर वाढलेली फलंदाजीची ताकद यामुळे संघाला विजयाची दिशा सापडली आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.