Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line : फोक्सवॅगन टायगनचा ‘हा’ किफायतशीर पर्याय

Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line : टायगनची ही अत्याधुनिक एसयुव्ही चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाईल. 

526
Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line : फोक्सवॅगन टायगनचा 'हा' किफायतशीर पर्याय
  • ऋजुता लुकतुके

जर्मन ऑटोमोबाईल कंपनी फोक्सवॅगनने (Volkswagen) आपल्या टायगन या एसयुव्हीचे दोन नवीन व्हेरियंट भारतीय बाजारात उतरवायचं ठरवलं आहे. यातील एक आहे टायगन १.५ टीएसआय जीटी प्लस स्पोर्ट. आणि दुसरा टायगन १.० टीएसआय एटी जीटी लाईन. या दोन प्रकारातून कंपनीने आपल्या ग्राहकांना एसयुव्हीचे दोन पर्याय दिलेले स्पष्ट दिसत आहे. ज्यांना कामगिरी आणि आक्रमक डिझाईन हवं असेल ते जीटीप्लस स्पोर्टचा पर्याय निवडतील. तर ज्यांना किफायतशीर आणि चांगलं मायलेज हवं असेल ते जीटी लाईनचा पर्याय निवडतील, असा कंपनीचा हिशोब आहे. (Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line)

टायगन जीटी लाईन गाडीचे दिवे हे स्मोक्ड प्रकारातील एलईडी दिवे आहेत आणि गाडीचं छप्पर स्टील ग्रे असेल. लाल रंगाचे व्होक्सवॅगन कंपनीचे बॅजेसही यात असतील. टायगन जीटी लाईनचं इंजिन हे ११४ बीएचपी क्षमतेचं असेल. यातून १७८ एनएम इतकी ऊर्जा तयार होईल. १.० पेट्रोल इंजिन ३ सिलिंडरचं टर्बो इंजिन आहे. (Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line)

(हेही वाचा – Crawford Market : क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी बाजारात शितगृहाची व्यवस्था, जूनपर्यंत होणार सर्वांसाठी खुले?)

जीटी लाईन गाडीत ६ स्पिडचा मॅन्युअम आणि स्वंयचलित गिअर बॉक्स असेल. जीटी प्लस आणि जीटी लाईन या दोन्ही गाड्यांचं इंटिरिअर साधारण सारखंच आहे आणि कंपनीने ते अधिक आकर्षक केलं आहे. सीटकव्हर काळ्या रंगांची आहेत आणि त्यात लाल घागा गुंफलेला आहे. भारतात टायगनच्या जीटी लाईनचं बेसिक मॉडेल अकरा लाखांपासून सुरू होतं. (Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.