Uddhav Thackeray यांना वेड लागले ; असे का म्हणाले Devendra Fadnavis ?

उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले प्रत्युत्तर

143
Uddhav Thackeray यांना वेड लागले ; असे का म्हणाले Devendra Fadnavis ?

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, फडणवीस यांनी ठाकरेंना वचन दिले होते की मी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री बनवेन आणि स्वतः दिल्लीला जाईन. २०१९ ची लोकसभा  निवडणूक (Lok Sabha election 2019) भारतीय जनता पक्ष (BJP) सोबत लढणारे उद्धव ठाकरे आता विरोधी महाविकास आघाडीचा (MVA) भाग आहेत. MVA मध्ये शिवसेना (UBT), NCP (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.  (Devendra Fadnavis)

काय म्हणाले होते  उद्धव ठाकरे ?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला (Indian Express interview) दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने आपला विश्वासघात केला आहे. ते म्हणाले, “आम्ही “हिंदुत्व’ आणि “देश’ या नावाने भाजपासोबत होतो. भाजपाने आमच्याशी असे का केले ? २०१४ मध्ये जेव्हा मोदी माझ्या घरी आले तेव्हा एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले होते. ठाकरे पुढे म्हणाले की, अमित शहा पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रणनीती वेगळी ठरवली. असा आरोप उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.  (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Thane Lok Sabha : ठाण्याचा गड शिवसेनेकडेच राहणार? सुभेदारी जाणार कुणाकडे? ) 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? 

माझे जूने मित्र उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या तोंडून सत्य बाहेर पडलं. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेड लागलं असेल. पण मला तर वेड लागलेलं नाही”, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जाहीर केले की, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढविण्याचा सल्ला मी दिला होता. पुढे जाऊन आदित्य ठाकरेकडे पक्ष सोपवायचा आहे, त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळाले पाहीजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : गडचिरोलीत १११ वर्षांच्या महिलेने केले मतदान )

घराणेशाही बाळगणारे मोदींना पराभूत करू शकत नाही. 

तसेच एक गोष्ट निश्चित झाली. मी मुख्यमंत्री नाहीतर माझा मुलगा मुख्यमंत्री, असा आपल्या परिवाराचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतीली तीनही पक्षांचे नेते फक्त स्वतःच्या मुलांचा आणि कुटुंबाचा विचार करणारे आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे पुढे कुणी नाही. ना परिवार, ना घर त्यामुळे घराणेशाही बाळगणारे कितीही पक्ष पुढे आले तरी ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  (Devendra Fadnavis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.