Thane Lok Sabha : ठाण्याचा गड शिवसेनेकडेच राहणार? सुभेदारी जाणार कुणाकडे?

ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आणि भाजपाकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाण्याचा गड राखण्यात शिवसेना यशस्वी होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

138
Thane Lok Sabha : ठाण्याचा गड शिवसेनेकडेच राहणार? सुभेदारी जाणार कुणाकडे?

ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार म्हणून निवडून आल्याने मुख्य नेता असलेल्या शिवसेनेचा हा मतदार संघ आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, या मतदार संघावर भाजपाकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे ठाण्याचा गड कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, शिवसेनेकडून नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आणि भाजपाकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाण्याच्या गडाच्या सुभेदारीसाठी कुणाची निवड केली जाते याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Thane Lok Sabha)

(हेही वाचा – Deepak Punia Misses a Bout : विमानाला झालेल्या उशिरामुळे दीपक पुनिया, सुजित कलाकल पात्रता स्पर्धेला मुकले)

शिवसेना पक्षाच्यावतीने ‘या’ नावांची चर्चा 

ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे राजन विचारे हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी सन २००९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. संजीव नाईक हे निवडून आले होते. परंतु त्यापूर्वी १९९६ पासून २००९ पर्यंत या मतदार संघात शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. पण त्या आधी या ठाण्याचा गड १९९६ पासून १९८९ पर्यंत भाजपाच्या ताब्यात होता. या मतदार संघात भाजपाचे जगन्नाथ शिवराम पाटील, शांताराम घोलप, राम कापसे असे चार वेळा भाजपाचे खासदार निवडून आले होते. त्याआधी रामचंद्र म्हाळगी हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्या आधी हा मतदार संघ काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात होता. (Thane Lok Sabha)

ठाणे आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्य नेता असलेला शिवसेनाच अधिकृत पक्ष असल्याने या पक्षाची याठिकाणी चांगली पकड आहे. मात्र, या लोकसभा मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने विद्यमान खासदार असलेल्या राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना पक्षाच्यावतीने नरेश म्हस्के, रविंद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यापूर्वी शिवसेना भाजपा युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. (Thane Lok Sabha)

(हेही वाचा – Rahul Bhandarkar : राहुल भांडारकर यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान)

शिवसेनेचे उमेदवारच अद्याप जाहीर झाले नाहीत

या ठाणे लोकसभा मतदार संघात मिरा भाईंदर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजीवडा, ठाणे, ऐरोली, बेलापूर आदी सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार असलेल्या राजन विचारे यांना ५ लाख ९५ हजार मतदान झाले होते, तर सन २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीचे उमेदवार असलेल्या विचारे यांच्या मतदानात भरघोस वाढ झाली होती. विचारे यांना या निवडणुकीत ७ लाख ४० हजार ९६० मतदान झाले होते. त्यामुळे तब्बल दीड लाख मतांची वाढ झाली होती आणि हा करिष्मा विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. (Thane Lok Sabha)

परंतु या सहा विधानसभा क्षेत्रापैंकी ठाणे, ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपाचे तीन आमदार असून मिरा भाईंदरमध्ये भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. तर कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा या दोन मतदार संघांमध्ये शिवसेनेचे आमदार आहे. त्यामुळे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी या लोकसभा मतदार संघात भाजपाचा (BJP) दावा केला आहे आणि या मतदार संघासाठी डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा आहे. मात्र ठाण्याची निवडणूक २० मे रोजी होणार यासाठी यासाठी २६ एप्रिल ते ३ मे या कालवधीत अर्ज भरण्याची मुदत आहे. एकीकडे राजन विचारे हे प्रचाराला लागलेले असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवारच अद्याप जाहीर होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जागेचाच निर्णय होत नाही तर उमेदवार कधी ठरणार असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. त्यामुळे विचारेंना प्रचार करण्यासाठी मैदान मोकळे आहे. शिवसेनेच्या वाट्याला हा मतदार संघ आल्यास प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के हे विचारेंना चांगलीच टक्कर देऊ शकतात. (Thane Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.