Deepak Punia Misses a Bout : विमानाला झालेल्या उशिरामुळे दीपक पुनिया, सुजित कलाकल पात्रता स्पर्धेला मुकले 

Deepak Punia Misses a Bout : दीपक पुनिया टोकयो ऑलिम्पिकमधील भारताचा आघाडीचा कुस्तीपटू होता. 

87
Deepak Punia Misses a Bout : विमानाला झालेल्या उशिरामुळे दीपक पुनिया, सुजित कलाकल पात्रता स्पर्धेला मुकले 
  • ऋजुता लुकतुके

दुबईतील पूर आणि खराब हवामानाचा फटका भारतीय कुस्तीपटूंना विचित्र पद्धतीने बसला आहे. पॅरिस ऑलिम्पिक साठीच्या पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी दीपक पुनिया (Deepak Punia) आणि सुजित कलाकल हे रशियातून किरगिझस्तानच्या बिशकेक इथं निघाले होते. पण, दुबईहून सुटणारं त्यांचं विमान उशिरा निघालं. आणि बिशकेकला दोघं वेळेवर पोहोचू शकले नाहीत. स्पर्धेपूर्वी खेळाडूंची वजनं केली जातात. त्यावेळी दोघं हजर नसल्यामुळे दोघांना बाद ठरवण्यात आलं. (Deepak Punia Misses a Bout)

भारतीय पथकाने विमान उशिरा पोहोचल्याचं कारण देऊन आयोजकांना विनंती केली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. दीपक पुनियाचं (Deepak Punia) टोकयो ऑलिम्पिकमधील पदक अगदी थोडक्यात हुकलं होतं. त्याच्या बरोबरच सुजित कलाकलही या स्पर्धेत पदकांचा दावेदार होता. शिवाय पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी दोघांकडे फक्त दोन संधी होत्या. त्यातली ही महत्त्वाची संधी हुकली आहे. (Deepak Punia Misses a Bout)

(हेही वाचा – IPL 2024 Suryakumar Yadav : क्रिकेटमधील चढ उतारांबद्दल सूर्यकुमार यादवला काय वाटतं?)

दोघांना करावा लागला अडथळ्यांचा सामना 

भारतीय कुस्तीपटू सध्या रशियात दागेस्तान इथं सराव करत होते. तिथून दुबईमार्गे दोघं बिशकेकला जाणार होते. पण, दुबईहून निघणारं त्याचं विमान खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलं. त्यानंतर नवीन विमानात त्याची सोय करण्यात आली. पण, वजनापूर्वी ते बिशकेकला पोहोचू शकले नाहीत. इतकंच नाही तर दुबई विमानतळावरही त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे पुरेसं अन्न नव्हतं आणि जमिनीवर त्यांना झोपावं लागलं. (Deepak Punia Misses a Bout)

आशियाई स्तरावर ऑलिम्पिक पात्रतेसाठी आता एकच स्पर्धा बाकी आहे. सुजित कलाकलचे वडील दयानंद कलाकल यांनी तीन दिवसांपूर्वीच ही बातमी प्रसारमाध्यमांकडे फोडली होती. ‘१६ तारखेपासून दीपक (Deepak Punia) आणि सुजित दुबई विमानतळावर अडकले आहेत आणि त्यांच्याकडे अन्न आणि इतर सोयींसाठी पैसे नाहीत,’ असं ते म्हणाले होते. (Deepak Punia Misses a Bout)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.