आमदार Raees Shaikh यांचा राजीनामा; पक्षांतर्गत नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा

मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन. मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे, असे रईस शेख यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

226
आमदार Raees Shaikh यांचा राजीनामा; पक्षांतर्गत नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्याकडे सोपवला आहे.पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यानेच शेख यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. (Raees Shaikh)

राज्यात समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला आघाडीत कोणतीही जागा सुटली नाही. मध्यंतरी शेख यांनी राज्यातील अल्संख्याक समुदयासाठी संयुक्त जाहीरनामा तयार करावा, अशी मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केल्याचे बोलले जाते. (Raees Shaikh)

(हेही वाचा – Narendra Modi: राहुल गांधींना वायनाडदेखील सोडावे लागेल, नरेंद्र मोदींचा दावा)

पक्षावरील निष्ठा कायम – रईस शेख

दरम्यान, समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातले मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडतो आहे. त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. माझी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन. मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे, असे रईस शेख यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (Raees Shaikh)

मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की राज्यातील पक्ष नेतृत्व हिताचा उचित निर्णय घेईल, असेही शेख यांनी नमूद केले आहे. (Raees Shaikh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.