IPL 2024 : यंदाच्या आयपीलमधील रंजक गोष्ट, सलग नववा सामना यजमान संघाने जिंकला

IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या आठवड्यात यजमान संघ सहज जिंकले आहेत. 

91
IPL Mega Auction : संपूर्ण लिलावापूर्वी संघांना ४ ऐवजी ८ खेळाडू राखून ठेवता येणार?
  • ऋजुता लुकतुके

या आयपीएलमध्ये सामन्यातील विजेत्याविषयीचं भाकीत करणं आतापर्यंत अगदी सोपं गेलंय. कारण असं की, यजमान संघ आतापर्यंत नऊच्या नऊ सामने जिंकलाय. आणि हा एक रंजक योगायोग आहे. पुढे असंच होईल, असं नाही. पण, आतापर्यंतची गुणतालिका हेच सांगते. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर संघ चांगली कामगिरी करतायत. (IPL 2024)

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या बालेकिल्लात त्यांचा उत्कृष्ट विक्रम कायम राखत आयपीएल २०२४ (IPL 2024) च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईने मंगळवारी आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात गुजरात टायटन्सचा ६३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. (IPL 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ८० हजार विरोधी पक्ष नेते भाजपात सामील)

या स्टेडियमवर पंजाब किंग्सने मिळवला दिल्ली कॅपिटल्सवर विजय

आयपीएल २०२४ (IPL 2024) चे आतापर्यंत एकूण नऊ सामने खेळले गेले आहेत, आणि नऊही सामन्यांमध्ये एक गोष्ट समान घडली. ती म्हणजे ज्या संघाच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळला गेला तो यजमान संघाने जिंकला आहे. त्याची सुरुवात हंगामातील पहिल्या सामन्याने झाली. तेव्हापासून आतापर्यंत सात सामने खेळले गेले आहेत आणि सर्व सामन्यांमध्ये फक्त तेच संघ जिंकले आहेत, ज्यांच्या घरच्या मैदानावर सामने खेळले गेले आहेत. (IPL 2024)

आयपीएल २०२४ (IPL 2024) चा पहिला सामना चेन्नईत खेळला गेला. जेथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात चंदिगढमधील मुल्लनपूरमधील महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्सने ४ विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. शनिवारीच आयपीएल तिसरा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात म्हणजेच इडन गार्डन्सवर खेळला गेला, जिथे त्याने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. (IPL 2024)

(हेही वाचा – सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय हाताळणारा कलाकार Vivaan Sundaram)

मुंबईचा संघ मारू शकला इतकी मजल

राजस्थान रॉयल्सचा बालेकिल्ला जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाचा २० धावांनी पराभव केला. तर त्याच दिवशी पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. गुजरातने हा सामना जिंकला. आणि सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा पराभव केला. आणि आता २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या बालेकिल्ला गुजरात टायटन्सचा पराभव केला. (IPL 2024)

सनरायझर्स हैद्राबाद संघाने तर घरच्या मैदानावर मुंबईसमोर २७७ धावांचा डोंगर रचला. या धावसंख्येचा पाठलाग करणं कठीणच होतं. आणि चांगला प्रयत्न करूनही मुंबईला ते जमलं नाही. मुंबईचा संघ ५ बाद २४६ इतकी मजल मारू शकला. शेवटी जिंकला तो यजमान देशच. राजस्थान रॉयल्स संघानेही घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी निसटता पराभव केला. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.