IPL 2024, Hardik Pandya : मुंबईला खरंच हार्दिकच्या चुकांचा फटका?

हार्दिकचे गोलंदाजीतले बदल, खेळाडूंना हाताळणं यावर जोरदार टीका होत आहे

141
IPL 2024 Hardik Pandya : मुंबईत हार्दिक जास्त ट्रोल होणार असं 'या' खेळाडूला का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये काल फलदाजांनी धावांचा पाऊस पाडला. दोन्ही संघांनी 200 पेक्षा अधिक धावा केल्या. मुंबई इंडियन्सला या मॅचमधील पराभवासह आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव सहन करावा लागला. माजी क्रिकेटपटूंसह मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी पराभवासाठी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) निर्णयांना जबाबदार धरलं आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, युसूफ पठाण यांनी हार्दिकच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गुजरात विरुद्धच्या मॅचनंतर देखील हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चाहत्यांच्या आणि माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आला होता. (IPL 2024)

टॉस जिंकून हैदराबादला फलंदाजीला बोलावणं महागात पडलं?

हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकूनही पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा घेत हैदराबादच्या टीमनं सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. सुरुवातीला ट्रेविस हेड, अभिषेक शर्मानं मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केली. यामुळं हार्दिकचा पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय चूकला की काय असं म्हटलं जावू लागलं आहे. (IPL 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ८० हजार विरोधी पक्ष नेते भाजपात सामील)

बुमराला उशिरा गोलंदाजी

जसप्रीत बुमराह गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला होता. हैदराबादच्या मॅचमध्ये बुमराहला पॉवर प्लेमध्ये केवळ एक ओव्हर देणयात आली. त्यानंतर जसप्रीत बुमराह थेट 12 व्या ओव्हरमध्येच बॉलिंगला आला. तोपर्यंत हैदराबादच्या 160 धावा झालेल्या होत्या. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जसप्रीत बुमराहचा योग्य वापर करु शकला नाही, अशी टीका केली जात आहे. पहिल्या मॅचमध्ये स्वत:बॉलिंगची सुरुवात करणाऱ्या हार्दिकनं यावेळी नवख्या गोलदाजांवर सुरुवातीला बॉलिंग करण्याची धुरा सोपवली. हैदराबादचे खेळाडू या संधीची वाट पाहत होते, त्यांनी या संधीचा फायदा घेत 20 ओव्हरमध्ये 3 बाद 277 धावा केल्या. (IPL 2024)

माजी क्रिकेटपटूंची टीका

मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुंबईचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) निर्णयांवर भाष्य केलं आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कॅप्टन्सी साधारण होती. मुंबईच्या इतर गोलदांजांना मार पडत असताना हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजी नं देणं समजण्यापालीकडील आहे, असं इरफान पठाण म्हणाला. याशिवाय हार्दिकच्या बॅटिंगवर देखील इरफान पठाणनं प्रश्न उपस्थित केले आहेत. टीमचे इतर बॅटसमन 200 च्या स्ट्राइक रेटनं धावा करत असताना कॅप्टनचं स्ट्राइक रेट 120 असू शकत नाही, असं इरफान म्हणाला. (IPL 2024)

दरम्यान, युसूफ पठाण म्हणाला सनरायजर्स हैदराबादनं 11 ओव्हर्समध्ये 160 हून अधिक धावा केल्या असताना हार्दिक पांड्यानं जसप्रीत बुमराहला एकच ओव्हर का दिली? तुमच्या बेस्ट बॉलरनं अशावेळी बॉलिंग करणं आवश्यक आहे. हा बॅड कॅप्टनसीचा प्रकार आहे, असं वाटत असल्याचं युसूफ पठाण म्हणाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.