IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामात एका षटकात २ बाऊन्सरना परवानगी 

एका षटकांत दोन बाऊन्सरना परवानगी हा छोटा बदल वाटत असला तरी त्याचा मोठा परिणाम खेळावर जाणवू शकतो

171
IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामात एका षटकात २ बाऊन्सरना परवानगी 
IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामात एका षटकात २ बाऊन्सरना परवानगी 

ऋजुता लुकतुके

आयपीएलने नवीन हंगामापासून एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. तो म्हणजे गोलंदाज एका षटकात आता दोन बाऊन्सर टाकू शकतील. नवीन हंगामापासून हा बदल लागू होईल. गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यात चांगला समतोल राखण्यासाठी हा बदल केल्याचं आयपीएल प्रशासनाचं म्हणणं आहे. भारतात होणाऱी देशांतर्गत टी-२० स्पर्धा अर्थात, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत या नियमाची चाचणी घेण्यात आली आहे.

टी-२० क्रिकेट हे घणाघाती फलंदाजी आणि षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. पण, त्यामुळे गोलंदाजांवर अनेकदा अन्याय होतो. शिवाय गोलंदाजांकडे या नियमामुळे एक नवा पर्याय उपलब्ध होतो तसंच फलंदाजांना चकवण्याची एक संधी मिळते, असं आयपीएल प्रशासनाचं म्हणणं आहे.

खासकरून भारतीय खेळपट्‌ट्यांवर टी-२० सामने एकतर्फी झाल्याची तक्रार अधून मधून होत असते. फलंदाज षटकामागे १० धावांच्या गतीने सहज धावा लुटतात. आणि गोलंदाजावर अन्याय होतो. शिवाय सामन्यातील रंगत हळू हळू कमी होते. त्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

भारताचा माजी तेज गोलंदाज जयदेव उनाडकटने या बदलाचं स्वागत केलं आहे. ‘हा बदल छोटा असला तरी त्याचा खूप मोठा परिणाम खेळावर होणार आहे. खासकरून शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना गोलंदाजाला जास्त पर्याय मिळतील आणि त्यामुळे सामन्याचे निकालही बदलू शकतील. गोलंदाज म्हणून माझा या नियमाला पाठिंबा आहे,’ असं उनाडकट क्रिकइन्फो या वेबसाईटशी बोलताना म्हणाला.

२०२३ च्या हंगामात आणलेला इम्पॅक्ट खेळाडूचा नियमही नवीन हंगामात कायम ठेवण्यात आला आहे. पण, त्यात एका छोटासा बदल झाला आहे. संघात आधीपासून ४ परदेशी खेळाडू असतील आणि इम्पॅक्ट खेळाडूला बदलायचं असेल तर अशावेळी इम्पॅक्ट खेळाडू हा भारतीयच हवा, असा बदल आता झाला आहे.

१९ तारखेच्या खेळाडूंच्या लिलावानंतर २० डिसेंबरला ट्रेडिंग विंडो पुन्हा सुरू झाली आहे. आणि संघ मालक खेळाडूंची देवाण घेवाण करू शकतील. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिना आधीपर्यंत ही विंडो सुरू राहील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.