IPL २०२३ चा नवा नियम! ‘इम्पॅक्ट प्लेअर’ गेमच बदलणार? जाणून घ्या…

4

भारतात आयपीएलच्या १६ व्या हंगामाला काही दिवसातच सुरूवात होणार आहे. ३१ मार्चपासून हा सीझन सुरू होणार असून यंदाच्या वर्षी IPL नियमांमध्ये BCCI कडून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणा-या राहुल गांधींना जोडे मारले; पण ‘शिदोरी’वर कारवाई कधी? )

नवे नियम काय आहेत?

  • टॉसवेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह ४ पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या ४ खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान प्रभावशाली खेळाडू (Impact Player) म्हणून वापर करू शकतो. ४ पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसोबत बदलता येईल.
  • बदली झालेला खेळाडू पुन्हा कोणत्याही स्वरूपात सामन्यात सहभागी होऊ शकत नाही. बदली खेळाडूला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणूनही सामन्यात समाविष्ट करता येत नाही.
  • इम्पॅक्ट खेळाडू कर्णधारपदी नियुक्त होऊ शकत नाही.
  • दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात एका इम्पॅक्ट खेळाडूचा वापर करू शकतात.
  • जर संघात ४ परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर करता येणार नाही.

DRS चा नियम 

  • IPL 2023 च्या प्रत्येक डावात दोन DRS असतील.
  • आयपीएलमध्ये खेळाडूंना वाइड आणि नो-बॉलचाही रिव्ह्यू घेता येणार आहे.
  • मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.