Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघांदरम्यान रंगतील ही ३ द्वंद्व

Ind vs Eng 1st Test : दोन संघांमधील कसोटी हे खेळाडूंमधील द्वंद्वही असतं. अशी जास्तीत जास्त द्वंद्व जिंकणाऱ्या खेळाडूंचा संघ विजयी होतो

146
Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघांदरम्यान रंगतील ही ३ द्वंद्व
Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघांदरम्यान रंगतील ही ३ द्वंद्व

ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्ध भारताची ५ कसोटी सामन्यांची ही प्रदीर्घ मालिका गुरुवारपासून सुरू होतेय. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहेच. (Ind vs Eng 1st Test) शिवाय संघातील काही खेळाडूंसाठी ही वर्चस्वाची लढाई असेल. विराट पहिल्या दोन कसोटींसाठी संघात नाहीए. पण, तो नसतानाही दोन्ही संघांदरम्यान वर्चस्वाच्या या लढाईत सगळ्यांचं लक्ष काही लढतींकडे असेल. अशा तीन उपलढाया बघूया,

जॉनी बेअरस्टो वि. अक्षर पटेल  (Jonny Bairstow Vs. Akshar Patel)

अक्षर पटेलने २०२१ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतच कसोटी पदार्पण केलं. आणि त्याचं पदार्पण यशस्वीही ठरलं. कारण, तीन कसोटींत मिळून त्याने तब्बल २७ बळी टिपले होते. यात त्याचं एक महत्त्वाचं सावज होतं ते म्हणजे जॉनी बेअरस्टो. अक्षरने त्याला दोनदा बाद केलं असलं तरी चकवलं अनंत वेळा.

(हेही वाचा – Siva Balakrishna ACB Raids : तेलंगणाच्या ‘या’ अधिकाऱ्याकडे सापडले तब्बल ४० लाख रोख, दोन किलो सोनं आणि बरच काही)

त्यामुळे बेअरस्टोच्या मानगुटीवर अक्षरचं भूत बसलेलं आहे हे नक्की. शिवाय इंग्लिश संघ प्रशासनाने यावेळी त्याची निवड निव्वळ फलंदाज म्हणून केली आहे. त्यामुळे त्याची जबाबदारीही वाढलेली असेल. अक्षरची डावखुरी फिरकी तो किती समर्थपणे हाताळतो यावर त्याच्या संघाचंही लक्ष असेल.

रोहीत शर्मा वि. मार्क वूड (Rohit Sharma Vs. Mark Wood)

मार्क वूड हा पहिल्या कसोटीसाठी संघातील एकमेव तेज गोलंदाज आहे. गेल्यावर्षीची ॲशेस मालिका पठ्ठ्याने गाजवली होती. म्हणूनच त्याचा अंतिम अकरात इतरांना डावलून समावेश झालाय. आणि गोलंदाजीची सुरुवात त्याला करायची आहे. त्याच्यासमोर असेल भारताची रोहीत आणि यशस्वी ही सलामीची जोडी.

(हेही वाचा – Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार ‘हा’ अनोखा जागतिक विक्रम)

पैकी रोहीत शर्मावर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत विशेष जबाबदारी आहे. शिवाय डावाच्या सुरुवातीला वेगवान धावा जमवून प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्याचं काम तो करू शकतो. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर नंतर चेंडू खूप वळायला लागला तर रोहीतच्या सुरुवातीच्या धावा भारताला तारु शकतील.

पण, रोहीतची एक कमजोरी आहे तो फटके खेळताना चेंडू हवेत ठेवण्याची. खास करून आखूड चेंडूवर ऑनला फटका खेळताना तो चेंडू हवेत ठेवतो आणि फाईन लेगला झेल उडतो. इंग्लंडमध्ये अशाच पद्धतीने मार्क वूडने त्याला पूर्वी बाद केलेलं आहे. म्हणूनच रोहीत आणि मार्क वूड दरम्यान एक द्वंद्व गुरुवारी रंगणार आहे.

बेन डकेट वि. रवीचंद्रन अश्विन (Ben Duckett Vs. Ravichandran Ashwin)

भारतासाठी जी भूमिका रोहीत शर्मा वठवतो, तीच इंग्लिश संघासाठी बेन डकेट बठवतो. वेगवान धावा करणं हा त्याचा स्थायीभाव आहे. आणि इंग्लिश संघाला दमदार पायाभरणी करून देणं ही आताही त्याच्यावरील जाबाबदारी आहे. पण, खेळ्पट्टीवर चेंडू वळायला लागला तर बेन डकेटला अगदी सुरुवातीलाच अश्विनचा सामना करावा लागेल.

आणि त्या आठवणी काही डकेटसाठी फारशा सुखावणाऱ्या नाहीत. यापूर्वी २०१६ मध्ये डकेट अश्विनसमोर फक्त ४० चेंडू टिकू शकला होता. आणि यात अश्विनने तीनदा त्याला बाद केलं. डकेट डावखुरा असल्यामुळे अश्विनचे ऑफ-ब्रेक खेळणं हेच त्याच्यासाठी आव्हान असणार आहे. अलीकडेच मीडियाशी बोलताना त्याने अश्विनचं आव्हान समोर उभं असल्याची कबुली दिली होती. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.