Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध भारताला विजयी चौकाराची संधी 

या विश्वचषकात सलग तीन सामने जिंकलेल्या भारतीय संघाला आता विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. पुण्यात आज भारतीय संघ बांगलादेशशी झुंजणार आहे 

21
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध भारताला विजयी चौकाराची संधी 
Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध भारताला विजयी चौकाराची संधी 

ऋजुता लुकतुके

या विश्वचषकात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्सने इंग्लंड तसंच दक्षिण आफ्रिका (Ind vs Ban) सारख्या संघाना लागोपाठ दणके दिले. त्यामुळे विश्वचषकात धक्कादायक निकालांची एक मालिका तयार झाली होती. पण, काल न्यूझीलंडने पुन्हा एकदा दाखवून दिलं की क्रिकेटचा क्लास काय असतो. आणि अफगाणिस्तानवर त्यांनी एकतर्फी विजय मिळवला.

आज भारत आणि बांगलादेशचे संघ पुण्या गहुंजेला आमने सामने येतील, तेव्हाही आधीचे धक्कादायक पराभव भारतीयांच्या मानगुटीवर नसतील. अगदी बांगलादेशच्या कट्टर चाहत्याला जरी विचारलं तरी आज तो भारताच्या बाजूनेच कौल देईल. कारण, भारतीय संघाचा सध्याचा जबरदस्त फॉर्म. पहिली फलंदाजी असो वा दुसरी. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघांना तीनही क्षेत्रात पराभूत केलं आहे.

पाक तसंच कांगारुंना त्यांनी दोनशेच्या आत रोखलं. आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करताना आघाडीच्या फळीने दमदार कामगिरी केलीय. महत्त्वाचं म्हणजे डेंग्यूशी झुंजणारा शुभमन गिल सोडला, तर रोहीत शर्मा, विराट कोहली, के एल राहुल तसंच श्रेयस अय्यर अशा सगळ्यांनी किमान एक अर्धशतक ठोकलंय. अशावेळी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतालाच फेव्हरिट मानण्यात येईल.

(हेही वाचा-Kolhapur Accident : महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

पुण्याची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. इथं झालेल्या पाच सामन्यांमध्ये तीन सामन्यांत पहिली फलंदाजी करणाऱ्या संघांनी तीनशेच्या वर धावा केल्या आहेत. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ पहिली फलंदाजीच करेल हे जवळपास निश्चित आहे.

बांगलादेशच्या संघाने (Ind vs Ban) यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा धक्कादायक पराभव केला होता. पण, त्यानंतर दोन संघांमध्ये झालेल्या चार विश्वचषक सामन्यांत भारतीय फलंदाजांनी कायम बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागने १७५ तर विराट कोहलीने धडाकेबाज १०० धावा करून बांगलादेशला मेटाकुटीला आणलं होतं. तर २०१५ आणि २०१९ मध्ये रोहीत शर्माने दोन खणखणीत शतकं ठोकली होती.

आताही मोठी धावसंख्या रचण्याची मनिषा भारतीय संघ बाळगून असेल. पुण्यात काल १८ ऑक्टोबरला स्टेडिअमच्या अवती भोवती हलका पाऊस झाला. पण, शुक्रवारचं वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशाचं आहे. आणि खेळपट्टी आजही फलंदाजीला पोषक दिसत आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.