Kolhapur Accident : महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

भरधाव वाहनाची दोन कार आणि चार दुचाकींना धडक

84
Kolhapur Accident : महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Kolhapur Accident) वाढ होतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

अधिक माहितीनुसार, कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात (Kolhapur Accident) भीषण अपघात झाला आहे. कसबा बावड्याकडून आलेल्या कारने थेट दोन कार आणि चार दुचाकींना धडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या चार जखमींपैकी एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी कोल्हापूर पोलिसांकडून सुरु आहे. ही घटना रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

(हेही वाचा – IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या पुण्यातील हवामानाबद्दल)

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं (Kolhapur Accident) वरुण कोरडे असं नाव असून तो बॅडमिंटनपटू होता. धडक दिलेल्या गाडीवर भारत सरकार जीएसटी इंटेलिजन्स असं लिहिलं होतं. MH10 EA9495 हा त्या गाडीचा नंबर आहे. ऋषिकेश कोतेकर हा गाडी चालवत होता. गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. या चारचाकीने भरधाव वेगात येत दोन चारचाकी आणि चार दुचाकींना धडक दिली. (Kolhapur Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.