Hardik Pandya Tattoo : हार्दिक पांड्याच्या शरीरावर किती टॅटू आहेत? त्यांचा अर्थ काय?

Hardik Pandya Tattoo : हार्दिक पांड्याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या शरीरावरील टॅटू आणि त्याचं महत्त्व सांगितलं होतं

58
Hardik Pandya Tattoo : हार्दिक पांड्याच्या शरीरावर किती टॅटू आहेत? त्यांचा अर्थ काय?
Hardik Pandya Tattoo : हार्दिक पांड्याच्या शरीरावर किती टॅटू आहेत? त्यांचा अर्थ काय?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्या खराब फॉर्मशी झगडतोय. शेवटच्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने ३१ धावांत ३ बळी मिळवले, ही त्याची पहिली लक्षणीय कामगिरी ठरली आहे. एरवी त्याच्या कप्तानीवर टीका होतेय. कामगिरीही लौकिकाला साजेशी होत नाहीए. खरंतर हार्दिकने आपली तडाखेबंद फलंदाजी आणि अष्टपैलू तेज गोलंदाज म्हणून भारतीय संघात इतक्या वर्षात अढळ स्थान मिळवलं आहे. भारतात तेज गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूच पटकन नजरेसमोर येत नाही. त्यात हार्दिकने कणखर मानसिकता दाखवून संघाला गरज असताना चांगली खेळी केली आहे. यातूनच हार्दिकने संघातील आपलं स्थान भक्कम केलं आहे. (Hardik Pandya Tattoo)

(हेही वाचा- Virat Kohli Net Worth : विराट कोहलीकडे एकूण किती पैसा आहे माहीत आहे? लाईफ स्टाईल आणि कमाईचा आकडा बघून व्हाल थक्क )

हार्दिक नवीन पिढीचा ‘प्ले हार्ड, वर्क हार्ड’ प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे क्रिकेटच्या बाहेर तो चांगली लाईफस्टाईल जगणं पसंत करतो. फॅशनची त्याला आवड आहे. त्याचबरोबर टॅटूंचीही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, त्याच्या शरीरावर एकूण १२ टॅटू आहेत. अलीकडेच एका युट्यूब चॅनलवर त्याने आपले सर्व टॅटू आणि त्याचं महत्त्व  समजावून सांगितलं. त्याच्या गळ्यावर असलेला शांतीचा टॅटू हा विशेष लोकप्रिय आहे. (Hardik Pandya Tattoo)

हार्दिकने दाखवलेले त्याचे काही टॅटू समजून घेऊया. 

‘बिलिव्ह टॅटू’ – हार्दिकच्या डाव्या हातावर इंग्रजीत बिलिव्ह अक्षरं कोरली आहेत. निम्न मध्यमवर्गीय स्तरातून आलेल्या हार्दिकने आजवर क्रिकेटसाठी केलेला संघर्ष आणि परिस्थिती बदलण्यासाठी दाखवेलला मनाचा निग्रह यासाठी त्याने हा टॅटू काढला आहे.

वाघाचा टॅटू – हार्दिकच्या डाव्या खांद्यावर वाघाचं अक्राळ विक्राळ तोंड कोरलेलं आहे. हा वाघ धैर्य आणि कणखरतेचं प्रतीक आहे.

नेव्हर गिव्ह अप – त्याच्या उजव्या मनगटावर हातात तलवार धरलेली एक वीरांगना आहे. खाली नेव्हर गिव्ह अप अशी अक्षरं कोरलेली आहेत. शब्दांप्रमाणेच त्याचा अर्थ हार मानू नकोस, असाच आहे.

लिव्ह टू सक्सीड, डाय ट्रायिंग – हार्दिकच्या डाव्या हातावर वाघाच्या टॅटूखाली ‘लिव्ह टू सक्सीड, डाय ट्रायिंग’ अशी अक्षरं कोरलेली आहेत. यातून हार्दिक स्वत:ला ‘प्रयत्न करत राहा. आयुष्यात प्रगती कर, प्रयत्न करताना जीव गेला तरी चालेल,’ असं बजावतो. हा त्याचा यशाचा मंत्र आहे.

कुत्र्याची पावलं – हार्दिक हा पेट-लव्हर आहे. आणि त्याच्या आवडत्या पपीच्या पायाचे ठसे त्याने आपल्या मानेवर उजव्या बाजूला कोरले आहेत.

पीस टॅटू – हार्दिकच्या डाव्या कानाच्या खाली लगेचच शांतीचं चिन्ह काढलेलं आहे. हा त्याचा सर्वात लोकप्रिय टॅटू आहे.

सिंहाचा टॅटू – त्याच्या मनगटावर असलेला सिंहाचा टॅटू त्याला ताकद, बळ आणि नेतृत्वाची शक्ती देतो

मीडिया प्लेअर टॅटू – हार्दिकच्या छातीवर संगणकातील मीडिया प्लेअरमधील पॉझ, प्ले आणि फॉरवर्ड बटनं कोरलेली आहेत. आयुष्यातील आठवणी पॉझ, प्ले आणि फॉरवर्ड करता याव्यात यासाठी त्याने तो कोरला आहे.

याशिवाय हार्दिकने आपला मुलगा अगस्त्यचं नावही टॅटूच्या स्वरुपात शरीरावर कोरलं आहे. (Hardik Pandya Tattoo)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.